निगडीतील भक्तिशक्ती चौैकात फडकणार तिरंगा, देशात सर्वाधिक उंचीमध्ये दुस-या क्रमांकाचा ध्वज; लवकरच लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 04:06 AM2017-11-27T04:06:33+5:302017-11-27T04:06:52+5:30

स्मार्ट सिटी, स्वच्छ शहर आणि मेट्रोनंतर आता पिंपरी- चिंचवड या उद्योगनगरीच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. देशातील दुसºया क्रमांकाचा उंच ध्वजस्तंभ उभारणीचे काम निगडी येथील भक्ती-शक्ती उद्यानात युद्धपातळीवर सुरू झाले आहे.

 Tri-color in the Bhagti Shakti Chowk of Nigdi, second highest flag in the country's highest height; Reconciliation soon | निगडीतील भक्तिशक्ती चौैकात फडकणार तिरंगा, देशात सर्वाधिक उंचीमध्ये दुस-या क्रमांकाचा ध्वज; लवकरच लोकार्पण

निगडीतील भक्तिशक्ती चौैकात फडकणार तिरंगा, देशात सर्वाधिक उंचीमध्ये दुस-या क्रमांकाचा ध्वज; लवकरच लोकार्पण

googlenewsNext

पिंपरी : स्मार्ट सिटी, स्वच्छ शहर आणि मेट्रोनंतर आता पिंपरी- चिंचवड या उद्योगनगरीच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. देशातील दुसºया क्रमांकाचा उंच ध्वजस्तंभ उभारणीचे काम निगडी येथील भक्ती-शक्ती उद्यानात युद्धपातळीवर सुरू झाले आहे. येत्या महिनाभरात १०७ मीटर उंचीचा तिरंगा पिंपरी-चिंचवडवासीयांना फडकताना पाहायला मिळणार आहे.
पुणे-मुंबई महामार्गावरील उद्योगनगरीचे प्रवेशद्वार म्हणून निगडी येथील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक परिचित आहे. तेथील उद्यानात एकशे सात मीटर उंचीचा तिरंगा ध्वज फडकविण्यास नुकतीच केंद्रीय गृह मंत्रालयाने परवानगी दिली आहे. त्यानुसार हा ध्वजस्तंभ उभारण्याचे काम महापालिकेच्या वतीने युद्धपातळीवर सुरू केले आहे. मोठमोठ्या क्रेनच्या साहाय्याने हा ध्वजस्तंभ उभारण्याचे काम सुरू असून, हे काम पुढील महिनाभरात पूर्ण होणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. रविवारी दिवसभर हा ध्वजस्तंभ उभारण्याचे काम सुरू होते. अशा प्रकारे पुण्यातदेखील ध्वज उभारण्यात आले आहेत.
याबाबत खासदार अमर साबळे म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवड
शहरात उभारला जाणारा ध्वज हा देशातील दुसºया क्रमांकाच्या उंचीचा आहे. गृह मंत्रालयाच्या वतीने या बाबतची नियमावली आणि परवानगी मिळाली आहे. निगडी येथे ध्वजाचे काम सुरू झाले असून, ते अंतिम टप्प्यात आहे.’’

असा आहे देशभरातील तिरंगा
वाघा सीमेवर देशातील सर्वांत उंच ध्वज उभारण्यात आला आहे. त्याची उंची ११० मीटर आहे. त्यापाठोपाठ अमृतसर येथील पाक सीमेवर अटारी या गावात ध्वजाची उंची ३६० फूट आहे. कोल्हापूर येथील पोलीस मुख्यालयानजीक पोलीस गार्डनमध्ये ३०३ फुटांचा ध्वजस्तंभ उभारला आहे. रांचीच्या पहाडी मंदिर परिसरातील ध्वज २९३ फूट उंचीचा आहे.
तेलंगणा राज्याच्या दुसºया वर्धापनदिनी उभा केलेला ध्वजस्तंभ २९१ फुटांचा आहे. ऐतिहासिक हुसेनसागर तलावाच्या किनाºयावर उभा आहे. छत्तीसगडची राजधानी रायपुरमधील तेलीबंधा तलावाच्या काठी हा स्तंभ उभा करण्यात आला.
रायपूरचे मरीन ड्राइव्ह नावाने ओळखल्या जाणाºया या
ठिकाणी दोन सेल्फी स्पॉट तयार केले आहेत. ज्या ठिकाणाहून लोकांना तिरंग्यासमोर उभे राहून सेल्फी काढता येतात. तसेच फ्री वायफाय झोन तयार केला आहे. पुण्यातही कात्रज तलावाजवळ २३७ फुटांचा ध्वजस्तंभ उभा केला आहे. पिंपरी-चिंंचवडमधील ध्वजामुळे शहराच्या सांैदर्यात भर पडेल असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

Web Title:  Tri-color in the Bhagti Shakti Chowk of Nigdi, second highest flag in the country's highest height; Reconciliation soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.