पाणी विकत घेण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 02:27 AM2018-09-18T02:27:54+5:302018-09-18T02:28:33+5:30

नागरिकांना करावी लागते भटकंती; महापालिकेचे दुर्लक्ष

Time to buy water | पाणी विकत घेण्याची वेळ

पाणी विकत घेण्याची वेळ

Next

रावेत : यंदा पावसाळ्यात पिंपरी-चिंचवड परिसरासह शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला. पवना धरण शंभर टक्के भरल्याने शहरवासीयांच्या पाण्याची चिंता मिटली असे बोलले जात होते. मात्र महापालिका प्रशासनाच्या नियोजनाअभावी रावेतकरांना पाण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. यामुळे ‘धरण उशाला, कोरड घशाला’ अशी स्थिती
रावेतच्या प्रभाग क्रमांक १६ मध्ये आहे.
रावेत येथील गावठाण, प्राधिकरण सेक्टर २९, ३२ जाधव वस्ती, शिंदे वस्ती, भोंडवेनगर आदी परिसरासह पाणीपुरवठा होणाºया भागात पाणी कमी दाबाने आणि अपुºया प्रमाणात येत असल्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांवर पाण्याचे विघ्न ओढवले आहे. काही दिवसांपासून सातत्याने विस्कळीत होणाºया पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.
रावेत परिसरात गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी इतरत्र भटकंती करावी लागत आहे. पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करावा, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत. गेल्या काही दिवसांपर्यंत नियमितपणे सर्वांना पुरेल एवढे पाणी नळास येत होते; परंतु मागील काही दिवसांपासून पाणी कमी दाबाने आणि अपुरा पुरवठा होत आहे.
काही भागात पुरेसा, तर काही भागात अपुºया दाबाने पाण्याचा पुरवठा होत आहे.
काही भागात अत्यंत कमी पाणी येत असल्याने नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ येत आहे. काही दिवसांपासून पाणी कमी दाबाने येत असल्यामुळे नागरिकांना दुरून पाणी आणावे लागत आहे. प्रभाग १६ मध्ये दिवसेंदिवस पाणीटंचाईची समस्या जाणवू लागली आहे. नेहमीच्या पाणीटंचाईमुळे नागरिकांचे विशेषत: महिलांचे हाल होत आहेत. पिण्यासाठी व दररोजच्या वापरासाठी लागणारे पाणी या भागातील नागरिकांना मिळत नाही.
गेल्या आठ-दहा दिवसांपासून अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. वाल्हेकरवाडी आणि परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत व पूर्ण दाबाने चालू करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत. पाणीपुरवठा सुरळीत नाही झाला, तर कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा या भागातील महिलांनी दिला आहे.

योग्य नियोजनाचा अभाव
पाणीपुरवठा ही तातडिक सेवा आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांच्या बजेटसह महापालिकेची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. शहरात लोकसंख्येच्या प्रमाणानुसार रावेत येथील बंधाºयातून दररोज लाखो लिटर पाण्याचा उपसा केला जातो. मात्र त्याचे वितरण करताना योग्य नियोजन केले जात नसल्याने सुरळीत पाणीपुरवठा होत नाही.

कमी दाबाने पाणीपुरवठा
रावेतच्या प्राधिकरण सेक्टर २९, ३२ मधील काही भागात गढूळ पाणीपुरवठा होत आहे. यामुळे साथीच्या आजाराने नागरिक हैराण झाले आहेत. अर्ध्या तासासाठी पाणी सोडले जाते. पाण्याचा दाब कमी असतो. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांकडे वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याचे नागरिक सांगतात.

रावेतसह प्रभागातील अनेक भागात पाणीटंचाई जाणवत आहे. याबाबत पाणीपुरवठा विभागाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु संपर्क झाला नाही. पाणीपुरवठा तातडीची सेवा असताना अधिकारी त्यांचा फोन बंद ठेवतात. याबाबत आयुक्तांकडे लेखी तक्रार करणार आहे. परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास शहराला रावेत येथून होणारा पाणीपुरवठा बंद करून पूर्ण शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत करण्यात येईल.
- मोरेश्वर भोंडवे, नगरसेवक

महापालिकेकडून शहरातील सर्वच भागांमध्ये नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा होत आहे. कमी किंवा अनियमित पाणीपुरवठा नाही. काही भागातील जलवाहिन्या जुन्या आणि जीर्ण झाल्या आहेत. त्या बदलण्याचे काम सुरू आहे. अशा जलवाहिन्यांमुळे गळती होते. त्यामुळे गढूळ पाणीपुरवठा झाल्यास नागरिकांनी त्वरित माहिती द्यावी. त्याबाबत महापालिकेकडून आवश्यक त्या उपाययोजना त्वरित करण्यात येतील.
- रामदास तांबे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका

Web Title: Time to buy water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.