घरांचे स्ट्रक्चरल आॅडिट, स्थायी समिती सभेत खर्चास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 01:20 AM2017-10-26T01:20:17+5:302017-10-26T01:20:25+5:30

पिंपरी : येथील भाटनगर पुनर्वसन प्रकल्पातील इमारतींची दुरवस्था झाली आहे. या प्रकल्पातील दोन जीर्ण इमारतींचे प्रातिनिधिक स्वरूपात स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

Structural audit of houses, sanction of expenditure in standing committee meeting | घरांचे स्ट्रक्चरल आॅडिट, स्थायी समिती सभेत खर्चास मंजुरी

घरांचे स्ट्रक्चरल आॅडिट, स्थायी समिती सभेत खर्चास मंजुरी

Next

पिंपरी : येथील भाटनगर पुनर्वसन प्रकल्पातील इमारतींची दुरवस्था झाली आहे. या प्रकल्पातील दोन जीर्ण इमारतींचे प्रातिनिधिक स्वरूपात स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी संस्थेची नियुक्तीचा ऐनवेळेसचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.
पिंपरीगाव ते लिंक रोड रस्त्यावर भाटनगर येथे पुनर्वसन प्रकल्प आहे. हा प्रकल्प १९८७ मध्ये तयार करण्यात आला. त्यातील इमारतींमधील १७ निवासी गाळ्यांचे १९९० मध्ये लाभार्थ्यांना वाटप केले होते. या इमारतीना ३० वर्ष पूर्ण झाली असून, यामध्ये या परिसरात ६४ इमारती असून, त्यामध्ये एकूण एक हजार ८० गाळे आहेत. या इमारतीमधील गाळ्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. याविषयी स्थायी समिती अध्यक्षांकडे नागरिकांनी आणि लोकप्रतिनिधींनी मागणी केली होती. त्यामुळे स्थायी समिती सभेत हा विषय ऐनवेळी घेण्यात आला.
अध्यक्षा सीमा सावळे म्हणाल्या, ‘‘या इमारतींना ३० वर्षे पूर्ण झाली असून, त्यामुळे इमारती जीर्ण झाल्या आहेत. सांडपाण्याचे पाइप, ड्रेनेजचे पाइप तुटलेले आहेत. इमारतीचे छत गळत आहे. जिन्याचे कडे तुटलेले आहेत. त्याचबरोबर जिन्यामधील पायºयांना संरक्षक भिंत नाही. अनेक इमारतींमध्ये तोडफोड झाली आहे. त्यामुळे या प्रकल्पातील दोन जीर्ण इमारतींचे प्रातिनिधिक स्वरूपात स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
त्यातून इमारतीची सद्य:स्थिती कळणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल.’’
घरकुल इमारतीचे नकाशे बांधकाम परवानगीकरिता पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडे सादर केले आहेत. या इमारतीच्या बांधकाम परवानगीकरिता प्राधिकरणाने १७ आॅक्टोबर २०१७ला पत्राद्वारे विविध प्रकारचे शुल्क भरण्याविषयी कळविले आहे. यातील १४ लाख ४६ हजार ही एक टक्के बांधकाम उपकर रक्कम महापालिकेमार्फेत सरकारकडे भरण्यात येणार आहे. इतर रकमांमध्ये विकास शुल्क म्हणून २८ लाख ८६ हजार रुपये, बांधकाम सुरक्षा रकमेपोटी २ लाख ३९ हजार रुपये आणि बांधकाम परवानगी शुल्कापोटी २३ हजार ९१२ रुपए असे एकुण ३१ लाख ४९ हजार रुपये शुल्क नवनगर विकास प्राधिकरणाकडे भरण्यात येणार आहे.
>वाहन दुरूस्ती विभागाच्या
वाढीव खर्चावर चर्चा
पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यशाळा विभागाकडील वाहन दुरूस्ती कामाच्या ठेक्यातील वाढीव खर्चाच्या मुद्द्यावर स्थायी समितीत चर्चा झाली. वाढीव खर्चाची जबाबदारी कोणाची, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. खर्चाची जबाबदारी विभागप्रमुखांनी घ्यावी, या संदर्भात खुलासा करावा, असे नमूद करून साडेचार कोटींच्या वाढीव खर्चाच्या विषयाला मंजुरी देण्यात आली.
स्थायी समितीत पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे ६१ लाख ७३ हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या. विषयपत्रिकेवर १७ विषय होते. त्यापैकी अवलोकनाचे ११ आणि मंजुरीचे सात विषय होते.
>घरकुल बांधकाम परवानगीसाठी महापालिका ३१ लाख शुल्क देणार
नवनगर विकास प्राधिकरणाच्या चिखली येथे बांधण्यात येत असलेल्या घरकुल प्रकल्पातील इमारतीच्या बांधकाम परवानगीकरिता प्राधिकरणाकडे शुल्क भरण्यात येणार आहे. त्यामध्ये विकास शुल्क, बांधकाम सुरक्षा रक्कम आणि बांधकाम परवानगी शुल्कापोटी ३१ लाख ४९ हजार रुपये भरण्यात येणार आहेत. महापालिकेतर्फे चिखली सेक्टर १७ आणि १९ येथे घरकुल गृहप्रकल्प राबविण्यात येत आहे.
या घरकुल प्रकल्पाचे सुधारीत नकाशे पिंपरी-
चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने १९ मे २०१७ रोजी मंजूर केले आहेत. या नकाशामधील टाऊन
हॉल, लायब्ररी, हेल्थ सेंटर, भाजी मंडईसाठीच्या
सुविधा भूखंडावर इमारत बांधण्यासाठी
महापालिकेचे आर्किटेक्ट व प्रकल्प सल्लागार म्हणून नेमणूक केली आहे.

Web Title: Structural audit of houses, sanction of expenditure in standing committee meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.