सिमेंटच्या जंगलातही जपली परंपरा, अनेक ठिकाणी काढण्यात आल्या बैलांच्या मिरवणुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 12:22 AM2017-09-23T00:22:27+5:302017-09-23T00:22:29+5:30

स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणा-या पिंपरी-चिंचवड शहराच्या ग्रामीण भागात आजही पारंपरिक सण-उत्सव सुरू असतात. वाल्हेकरवाडी येथे भाद्रपदी बैलपोळा साजरा करून ग्रामसंस्कृतीचे दर्शन घडले.

Simplified traditions in cement forests, bullocks' procession taken in many places | सिमेंटच्या जंगलातही जपली परंपरा, अनेक ठिकाणी काढण्यात आल्या बैलांच्या मिरवणुका

सिमेंटच्या जंगलातही जपली परंपरा, अनेक ठिकाणी काढण्यात आल्या बैलांच्या मिरवणुका

Next

पिंपरी : स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणा-या पिंपरी-चिंचवड शहराच्या ग्रामीण भागात आजही पारंपरिक सण-उत्सव सुरू असतात. वाल्हेकरवाडी येथे भाद्रपदी बैलपोळा साजरा करून ग्रामसंस्कृतीचे दर्शन घडले.
गावाचे महानगर आणि महानगराचे आता स्मार्ट सिटीत रूपांतर होत आहे. महापालिकेच्या हद्दीत वसलेल्या वाल्हेकरवाडीत आजही अनेक शेतकरी परंपरा आणि संस्कृतीचे जतन करताना दिसतात. नागरीकरण वाढले असले, तरी पारंपरिक सण अजूनही टिकून आहेत. तसेच या परिसरात आजही मोठ्या प्रमाणावर शेतकरी शेती करतात. भाद्रपदी पोळा या भागात साजरा केला जातो. अनेक शेतकरी, ग्रामस्थांनी बैलांना सजवून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करीत मिरवणुका काढल्या.
या मिरवणुकीत चिंचवडे, भोईर, गावडे, वाल्हेकर, भालके, आहेर, पडवळ, साठे, शिवले आदी शेतकºयांच्या बैलजोड्या सहभागी होत असतात. मिरवणुकीत चंद्रहास वाल्हेकर, नंदकुमार शिवले, पांडुरंग शिवले, रामदास वाल्हेकर, रामभाऊ वाल्हेकर, हनुमंत वाल्हेकर, रवींद्र वाल्हेकर, ज्ञानेश्वर वाल्हेकर, प्रवीण वाल्हेकर, राजाराम वाल्हेकर, भगवान जगताप, महादू वाल्हेकर, संदीप वाल्हेकर, विलास वाल्हेकर,अनिल वाल्हेकर, निखिल वाल्हेकर, सोपान वाल्हेकर, प्रदीप वाल्हेकर, प्रकाश वाल्हेकर, झुंबर शिवले, शिवाजी शिवले, वाल्मिक शिवले यांनी बैलांच्या मिरवणुका काढत संस्कृतीचे दर्शन घडविले.
त्याचबरोबर सचिन चिंचवडे, शंकर चिंचवडे, अनिल चिंचवडे, नाना पडवळ, दत्ता चिंचवडे यांनीही आपल्या बैलांची मिरवणूक काढली. वाल्हेकवाडी, चिंचवडेनगर, चिंचवडगावातून मिरवणूक काढण्यात आली होती. पारपंरिक वाद्यांच्या गजरात भंडारा उधळत ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरास प्रदक्षिणा घालून मिरवणुकीची सांगता झाली.

Web Title: Simplified traditions in cement forests, bullocks' procession taken in many places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.