धक्कादायक! पत्नी नांदत नसलेल्या तरुणाकडून अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार

By नारायण बडगुजर | Published: July 19, 2022 05:50 PM2022-07-19T17:50:01+5:302022-07-19T17:50:54+5:30

पत्नी चार वर्षांपासून नांदत नसल्याचे पोलीस चौकशीत समोर...

Sexual abuse of a minor by a young man who does not have a wife | धक्कादायक! पत्नी नांदत नसलेल्या तरुणाकडून अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार

धक्कादायक! पत्नी नांदत नसलेल्या तरुणाकडून अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार

Next

पिंपरी : चाॅकलेटचे आमिष दाखवून सात वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केला. थेरगाव येथे रविवारी (दि. १७) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा प्रकार घडला. वाकड पोलिसांच्या तपास पथकाने ७० सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून १६ तासात आरोपी तरुणाला बेड्या ठोकल्या. आरोपी हा त्याच्या आईवडिलांसह राहत असून त्याला एक मुलगा आहे. त्याची पत्नी चार वर्षांपासून नांदत नसल्याचे पोलीस चौकशीत समोर आले.  

अलिम मुसा शेख (वय २७, रा. काळेवाडी, मुळगाव शिरुर ताजमल, ता. अहमदपूर, जि. लातूर) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थेरगाव येथील बापुजीबुवा उद्यानात खेळणाऱ्या सात वर्षांच्या अल्पवयीन मुलास चॉकलेटचे आमिष दाखवून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तरुण पळून गेला. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. वाकड पोलिसांच्या तपास पथकाने ७० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची पाहणी केली. त्यावरून संशयित तरुणाची ओळख पटवून तो रहात असलेल्या परिसरात सापळा रचला. यात शेख याला ताब्यात घेतले. अधिक तपास करून शेख याला सोमवारी (दि. १८) अटक करण्यात आली. त्याला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. शेख याच्यावर यापूर्वी पिंपरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे.
 
वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सत्यवान माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) रामचंद्र घाडगे, संतोष पाटील, सहायक निरीक्षक संभाजी जाधव, उपनिरीक्षक अवधूत शिंगारे, पोलीस कर्मचारी बिभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे, वंदु गिरे, दीपक साबळे, स्वप्नील खेतले, बंडु खाडे, अतिश जाधव, प्रमोद कदम, विक्रांत चव्हाण, अतिक शेख, प्रशांत गिलबीले, तात्यासाहेब शिंदे, भास्कर भारती व अजय फल्ले यांच्या पथकाने ही कामगिरी केली.  

चार वर्षांपासून पत्नी राहते वेगळी

अलिम शेख हा मिळेल ते काम करतो. त्याला एक लहान मुलगा आहे. मात्र गेल्या चार वर्षांपासून त्याची पत्नी नांदत नसून, अलिम शेख हा त्याच्या आईवडिलांसोबत रहात आहे. तसेच तो व्यसनांच्या आहारी गेल्याचेही तपासातून समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Sexual abuse of a minor by a young man who does not have a wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.