77 किलोमीटर सायकलिंग करत साजरा केला 77वा वाढदिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 02:50 AM2018-10-31T02:50:04+5:302018-10-31T07:03:28+5:30

तरुणांपुढे ठेवला आदर्श; निवृत्त सैनिकाने वाढदिवसानिमित्ताने संकल्प केला पूर्ण

retired navy man celebrates his 77th birthday by cycling 77 kilometers | 77 किलोमीटर सायकलिंग करत साजरा केला 77वा वाढदिवस

77 किलोमीटर सायकलिंग करत साजरा केला 77वा वाढदिवस

googlenewsNext

पिंपरी : प्रत्येक व्यक्तीसाठी आपला वाढदिवस विशेष असतो. या दिवशी वेगळे काही करण्याचा प्रत्येकाचा ध्यास असतो. त्यासाठी कोणी अनाथाश्रमातील मुलांसोबत वाढदिवस साजरा करतात, तर कोणी पर्यावरण रक्षणासाठी झाडांची लागवड करतात. निवृत्त सैनिक असलेल्या पिंपरीतील ७७ वर्षांच्या आजोबांनी आपला वाढदिवस ७७ किलोमीटर सायकल चालवून अनोख्या पद्धतीने मंगळवारी साजरा केला. अरविंद दीक्षित असे त्यांचे नाव आहे.

बदलत्या जीवनशैलीमध्ये तंदुरुस्त राहण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करतो. पहाटे फिरायला जाणे, पोहणे, सायकलिंग करणे असे छंद जोपासले जातात. दीक्षित हे अभियंता असून, त्यांनी १४ वर्षे इंडियन नेव्हीमध्ये नोकरी केली. त्यानंतर २५ वर्षे दिल्ली विद्यापीठात वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून काम केले. नाट्य, भाषांतर, वाचन, लेखन याचा त्यांना छंद आहे. नियमितपणे सायकलिंग करणाऱ्या दीक्षित यांनी वाढदिनी ७७ किमी सायकल चालवून तरुणांपुढे व्यायामाचा आदर्श ठेवला आहे.

प्राची परांजपे, मुक्ता जोशी, सचिन चित्तापुरे, नचिकेत कुंटे, पराग काटदरे, सुनील ननावरे, सुनील पाटील या सात जणांनीही दीक्षित यांच्यासह ७७ किलोमीटर सायकल चालवून साथ दिली. ७७ व्या वर्षी ७७ किलोमीटर सायकल चालवून आजच्या तरुण पिढीपुढे त्यांनी वेगळा आदर्श ठेवला आहे. त्याचप्रमाणे आजचे तरुण जे रात्री-अपरात्री हुल्लडबाजी करत, पैशांचे प्रदर्शन करत, मोठमोठे अनधिकृत फ्लेक्स उभे करून वाढदिवस साजरा करतात, त्यांना चपराकच मारली आहे.

मला हे करायचे आहे, असे आपण एकदा ठरवले आणि त्यानुसार मेहनत, जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी ठेवली, तर आपण ती गोष्ट सहज साध्य करू शकतो. यामध्ये वयाचा संबंध येत नाही. मी ठरविले होते, की मला ७७ किलोमीटर सायकल चालवायची आहे आणि ते मी केले. सायकल चालविणे हे आरोग्यासाठी फायद्याचेच आहे. आजच्या तरुणांनी यापासून बोध घेऊन कोणाला काही हानी पोहचणार नाही, अशा पद्धतीने वाढदिवस साजरा करावा. - अरविंद दीक्षित

पिंपरीतील मासूळकर कॉलनी येथील रहिवासी अरविंद दीक्षित यांनी ७७ व्या वर्षी ७७ किलोमीटर सायकल चालवून एक अनोखी प्रेरणा समाजापुढे ठेवली आहे. यासाठी ते महिनाभर सराव करीत होते. ७७ किलोमीटरचा हा टप्पा त्यांनी अवघ्या सहा तासांत पार पाडला. पहाटे सव्वापाच ते सकाळी सव्वाअकरा या वेळेत त्यांनी ७७ किलोमीटर सायकल चालवली.

मासूळकर कॉलनी, रसरंग चौक, अंतरिक्ष चौक, अण्णासाहेब मगर स्टेडिअम, यशवंतनगर, टेल्को कंपनी, केएसबी चौक, आयुक्त बंगला, मोरवाडी कोर्ट, लालटोपीनगर, सम्राट चौक, देऊबाई कापसे उद्यान व तेथून पुन्हा मासूळकर कॉलनीतील दत्त मंदिर याप्रमाणे १२ फे ºया मारल्या.

 

Web Title: retired navy man celebrates his 77th birthday by cycling 77 kilometers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.