आपत्तीनिवारण कक्ष सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 03:03 AM2018-08-22T03:03:15+5:302018-08-22T03:03:50+5:30

पवना नदीला पूर येण्याची शक्यता निर्माण झाल्याने महापालिकेच्या आपत्ती निवारण विभागाची तातडीची बैेठक झाली.

Rescue Room Ready | आपत्तीनिवारण कक्ष सज्ज

आपत्तीनिवारण कक्ष सज्ज

Next

पिंपरी : पावसाचा जोर वाढल्याने पवना धरणातून साडेचार हजार क्युसेक पाणी सोडले आहे. त्यामुळे पवना नदीला पूर येण्याची शक्यता निर्माण झाल्याने महापालिकेच्या आपत्ती निवारण विभागाची तातडीची बैेठक झाली. दक्षता घेण्याची सूचना प्रशासनाने सर्व प्रभाग आणि अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड आणि मावळ भागात पावसाचा जोर कायम आहे. पवना धरण परिसरातही पाऊस वाढला आहे. पवना धरण १०० टक्के भरले असून, धरणातून दररोज पाण्याचा विसर्ग वाढत आहे. सुमारे साडेचार हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. परिणामी नदी पात्रातील पाण्याचा प्रवाह नेहमीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे नदीकाठावरील वस्त्यांमधील नागरिकांनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. आपत्कालीन परिस्थिती ओढावू नये यासाठी महापालिकेच्या वतीने या संदर्भातील बैठक घेतली. सर्व संबंधित विभागांना यंत्रणा सुसज्ज ठेवणेबाबत सूचना केल्या आहेत.
अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे म्हणाले,‘‘आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी मनपाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये मध्यवर्ती पूरनियंत्रण कक्ष तसेच क्षेत्रीय कार्यालयस्तरावर पूरनियंत्रण कक्ष सुरू केला असून, नागरिकांनी या केंद्राशी संपर्क साधावा. स्थापत्य, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, आरोग्य, अग्निशमन अशा सर्वच विभागांना सूचना दिल्या आहेत.’’

पवना धरण परिसरात सलग आठ दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे मंगळवारी (दि. २१) दुपारी तीनपासून धरणाच्या पॉवर हाऊसच्या माध्यमातून १४००, तर धरणाचे सहाही दरवाजे एक फुटाने उघडून ४६०० क्युसेक, असा एकूण ६००० क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला आहे. परिसरातील शिवली, कोथुर्णे हे दोन्ही पूल पाण्याखाली गेल्याने नदीपलीकडच्या गावांचा संपर्क तुटला आहे. यामध्ये शिवली, येलघोल, धनगव्हाण, येवलेवाडी, भडवली, काटेवाडी, मळवंडी ठुले, कोथुर्णे या गावांचा येळसे व पवनानगरमार्गे होणारा संपर्क दुपारी तीननंतर तुटला आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रात्री पावसाचा जोर वाढल्यास पवना नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार आहे.
- ए. एम. गदवाल,
शाखा अभियंता, पवना धरण

मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्ष ०२०-६७३३१५५६ व ३९३३१४५६,
मुख्य अग्निशमन केंद्र १०१, ०२० - २७४२३३३३, २७४२२४०५, ९९२२५०१४७५
अ क्षेत्रीय कार्यालय २७६५६६२१, २७६४१६२७, ९९२२५०१४५३, ९९२२५०१४५४
ब क्षेत्रीय कार्यालय २७५०१५३, ९९२२५०१४५५, ९९२२५०१४५६
क क्षेत्रीय कार्यालय २७१२२९६९, ९९२२५०१४५७, ९९२२५०१४५८.
ड क्षेत्रीय कार्यालय २७२७७८९८, ९९२२५०१४५९, ९९२२५०१४६०.
ई क्षेत्रीय कार्यालय २७२३०४१०, २७२३०४१२, ८६०५७२२७७७
फ क्षेत्रीय कार्यालय २७६५०३२४, ८६०५४२२८८८
ग क्षेत्रीय कार्यालय ७७८७८६८५५५, ७८८७८७९५५५
ह क्षेत्रीय कार्यालय २७१४२५०३, ९१३००५१६६६, ९१३००५०६६६

Web Title: Rescue Room Ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.