पिंपरी : शहरात आत्महत्येच्या तीन वेगवेगळ्या घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 06:58 AM2018-03-01T06:58:58+5:302018-03-01T06:58:58+5:30

नोकरी नाही, त्यातच आजारपण यामुळे आलेल्या नैराश्यापोटी भोसरीत सिद्धेश्वर कॉलनीत राहणा-या चंद्रकांत काशिनाथ जाधव याने...

Pimpri: Three different cases of suicide in the city | पिंपरी : शहरात आत्महत्येच्या तीन वेगवेगळ्या घटना

पिंपरी : शहरात आत्महत्येच्या तीन वेगवेगळ्या घटना

googlenewsNext

पिंपरी : रुपीनगरमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. प्रभाकर केशव पांचाळ (वय ६५, रा. सरस्वती हौसिंग सोसायटी, रुपीनगर, तळवडे) असे आत्महत्या केलेल्या ज्येष्ठाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभाकर पांचाळ या वयोवृद्ध गृहस्थाने राहत्या घरात छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला.
निगडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह रुग्णालयात पाठविण्यात आला. नेमके आत्महत्येमागील कारण काय, याचा शोध पोलीस घेत आहेत.
अल्पवयीन मुलीची भोसरीत आत्महत्त्या-
पिंपरी : भोसरीतील डोळस वस्ती येथे १३ वर्षांच्या मुलीने घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार दुपारी साडेतीनला उघडकीस आला. खुशी माऊली सिंग असे या मुलीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुशीचे वडील कामाला गेले होते. त्या वेळी तिची आई घरात होती. मात्र, दुसºया खोलीत जाऊन खुशीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. खुशी सातवीत शिकत होती. ती अभ्यासत कच्ची असल्याने काही दिवसांपूर्वी शिक्षकांनी तिच्या पालकांना शाळेत बोलावले होते. खुशी अभ्यासात कमी असल्याची समज या वेळी पालकांना देण्यात आली. त्यानंतर ती नाराज होती. त्यामुळे नैराश्यापोटी तिने आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तिचे वडील सुरक्षा पर्यवेक्षक म्हणून गहुंजे येथे काम करतात.
नैराश्यापाटी एकाने पेटवून घेतले-
पिंपरी : नोकरी नाही, त्यातच आजारपण यामुळे आलेल्या नैराश्यापोटी भोसरीत सिद्धेश्वर कॉलनीत राहणा-या चंद्रकांत काशिनाथ जाधव (वय ४८) याने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. त्यात १०० टक्के भाजल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना दुपारी ११ च्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धेश्वर काशिनाथ जाधव हे ४८ वर्षे वयाचे गृहस्थ गेल्या काही दिवसांपासून नैराश्याच्या गर्तेत होते. रोजगार नव्हता, त्यातच आजाराच्या उपचारासाठी औषधोपचाराचा खर्च होत होता. आजारपणाला कंटाळून त्याने अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. त्यात त्याचा मृत्यू झाला.

Web Title: Pimpri: Three different cases of suicide in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.