Pimpri Chinchwad | पिंपरी-चिंचवड शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 11:24 AM2023-03-01T11:24:17+5:302023-03-01T11:25:16+5:30

शुक्रवारी पाण्याचा पुरवठा कमी दाबाने व अपुरा होण्याची शक्यता...

pimpri chinchwad water cut water supply cut off on Thursday | Pimpri Chinchwad | पिंपरी-चिंचवड शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

Pimpri Chinchwad | पिंपरी-चिंचवड शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

googlenewsNext

पिंपरी : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) रावेत येथील पाणीपुरवठा केंद्रातील देखभाल दुरुस्तीची कामे गुरुवारी (दि.२) दिवसभर होणार आहेत. त्यामुळे दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पाण्याचा पुरवठा कमी दाबाने व अपुरा होण्याची शक्यता आहे.

तरी पिंपरी-चिंचवड, भोसरी, देहूरोड, कासारवाडी, फुगेवाडी, निगडी, सीएमई, दिघी, व्हीएसएनएल, कॅन्टोन्मेंट बोर्ड, ओएफडीआर या भागातील नागरिकांचा पाणीपुरवठा विस्कळीत होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी अगोदरच पाण्याचा साठा करण्याची काळजी घ्यावी, असे आवाहन एमआयडीसीचे स्थापत्य विभागाने कळविले आहे.

Web Title: pimpri chinchwad water cut water supply cut off on Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.