पिंपरी चिंचवड : मेट्रोच्या बांधकामादरम्यान ड्रिल मशिन कोसळली, सुदैवानं जीवितहानी नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2019 17:24 IST2019-01-05T16:23:19+5:302019-01-05T17:24:41+5:30
पिंपरी चिंचडवमध्ये मेट्रोच्या बांधकामादरम्यान खड्डे पाडणारी ड्रिल मशिन रस्त्यावर कोसळली. नाशिक फाटा येथे शनिवारी (5 जानेवारी) दुपारच्या सुमारास ही घटना घडली.

पिंपरी चिंचवड : मेट्रोच्या बांधकामादरम्यान ड्रिल मशिन कोसळली, सुदैवानं जीवितहानी नाही
पिंपरी चिंचवड - पिंपरी चिंचडवमध्ये मेट्रोच्या बांधकामादरम्यान खड्डे पाडणारी ड्रिल मशिन रस्त्यावर कोसळली. नाशिक फाटा येथे शनिवारी (5 जानेवारी) दुपारच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण हा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे घडला, याबाबतची माहिती अद्याप स्पष्ट होऊ शकलेली नाही.
पुणे महामेट्रोचे 'पिंपरी ते स्वारगेट' मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. नाशिक फाटा हे वर्दळीचे ठिकाण आहे. येथे मेट्रोचे काम सुरू असताना ड्रीलिंग मशिन कोसळली. सुदैवानं मशिन मेट्रो कामाच्या कार्यक्षेत्रात कोसळली, ही मशिन पलिकडे रस्त्यावर कोसळली असती तर मोठा अनर्थ झाला असता. दरम्यान, या घटनेनंतर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्यानं वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
पण, मेट्रोच्या या भोंगळ कारभारावर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय.