पोलिसाला मारहाणप्रकरणी पिंपळे गुरवला तिघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 05:12 AM2019-03-25T05:12:44+5:302019-03-25T05:12:54+5:30

पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करीत दमदाटी व मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपळे गुरव येथील डायनासोर गार्डनच्या समोर शनिवारी मध्यरात्री घडली.

Pimpale Gurwala is guilty of assault on policeman | पोलिसाला मारहाणप्रकरणी पिंपळे गुरवला तिघांवर गुन्हा

पोलिसाला मारहाणप्रकरणी पिंपळे गुरवला तिघांवर गुन्हा

Next

पिंपरी : पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करीत दमदाटी व मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपळे गुरव येथील डायनासोर गार्डनच्या समोर शनिवारी मध्यरात्री घडली.
मनोहर कडू सोनवणे (वय ४६) असे मारहाण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी खैरे (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) याच्यासह आणखी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शनिवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास डायनासोर गार्डनसमोर आरोपी हातात दगड घेऊन आरडाओरडा करीत होते. त्या वेळी सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यास ताब्यात घेतले. त्या वेळी सोनवणे यांना आरोपीने शिवीगाळ करीत हाताने मारहाण करून बघून घेण्याची व नोकरी घालविण्याची धमकी दिली. तसेच आरोपीच्या इतर दोन साथीदारांनी सोनवणे व त्यांच्या सहकाºयांना दगड फेकून मारले. दरम्यान, मारहाण व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Pimpale Gurwala is guilty of assault on policeman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.