PCMC: करवसुलीत पिंपरी-चिंचवड आघाडीवर! ६८१ कोटींची केली वसुली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 12:18 PM2024-01-12T12:18:07+5:302024-01-12T12:30:10+5:30

पिंपरी- चिंचवड महापालिका परिसरामध्ये सहा लाख दहा हजार मिळकती आहेत...

PCMC: Pimpri-Chinchwad in the lead in tax collection! 681 crores was recovered | PCMC: करवसुलीत पिंपरी-चिंचवड आघाडीवर! ६८१ कोटींची केली वसुली

PCMC: करवसुलीत पिंपरी-चिंचवड आघाडीवर! ६८१ कोटींची केली वसुली

पिंपरी : मिळकतकर वसुलीमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिका आघाडीवर आहे. आर्थिक वर्ष संपण्यास तीन महिने शिल्लक राहिले असताना ६८१ कोटीची वसुली महापालिकेने केली आहे. आजवरच्या वसुलीमध्ये सर्वाधिक करवसुली आहे. पिंपरी- चिंचवड महापालिका परिसरामध्ये सहा लाख दहा हजार मिळकती आहेत.

महापालिका कर संकलन विभागाच्या वतीने मिळकत कराची वसुली केली जाते. मिळकतकर वसुलीचा उच्चांक कर संकलन विभागाने केला आहे. आयुक्त शेखर सिंह यांनी सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांच्याकडे मिळकतकर विभागाचा पदभार दिला. त्यानंतर देशमुख यांनी करवसुलीसाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखला. त्याचा परिपाक म्हणजे मिळकतकराची वसुली वाढली. त्याचबरोबर अनधिकृत बांधकामे शास्ती कर लागलेल्या मिळकतीवरील शास्ती कर रद्द झाला. त्यानंतर थकीत कराची वसुली, ही मोठ्या प्रमाणावर झाली.

ऑनलाइन कर भरला

शहर परिसरातील ४ लाख २०३५ नागरिकांनी कर भरला असून आतापर्यंत ६८१.१४ कोटीची वसुली झाली आहे. त्यात ऑनलाइन कर भरणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे. सुमारे सव्वा दोन लाख नागरिकांनी ऑनलाइन कर भरला आहे.

कर वसुलीसाठी केले प्रयत्न!

१) मिळकतकर वसुलीसाठी महापालिकेच्या कर संकलन विभागाने वसुलीबरोबरच जागृती अभियान ही राबविले. थकबाकी वसुलीसाठी प्रभागनिहाय नियोजन केले. सुरुवातीला बिले पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर जप्ती पत्रे धाडली.

२) जप्ती मोहिमेसाठी विविध उपक्रम राबविले. जिंगलद्वारे प्रबोधन, रिक्षावरती छोटे पोस्टर लावले. त्यात मोहिमेची माहिती दिली.

मिळकतकर वसुलीसाठी महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या विविध योजनांची जनजागृती केली. करवसुलीचे उद्दिष्ट गाठण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले. करवसुली होण्यासाठी योजना पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला. त्याचा परिपाक म्हणून मोठ्या प्रमाणावर करवसुली झाली. वेळेवर कर भरणाऱ्या नागरिकांना महापालिकेच्या वतीने सवलत दिली आहे.

- नीलेश देशमुख, सहायक आयुक्त

महापालिकेच्या वतीने विविध सवलत योजनाबाबत जागृती केली. तसेच शास्तीकर वगळून कर भरण्याची सुविधा तसेच उपयोगकर्ता शुल्क वसूल करण्यास राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने तात्पुरती स्थगिती दिल्यानंतर संगणक प्रणालीत बदल केला. मिळकत कर भरणा वाढला. त्यामुळे करवसुलीचे उद्दिष्ट गाठता येणार आहे.

- शेखर सिंह, आयुक्त, प्रशासक

Web Title: PCMC: Pimpri-Chinchwad in the lead in tax collection! 681 crores was recovered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.