नगरसेवकांच्या नावे नोटीस , महापालिका प्रशासनाला सदस्यांनी धरले धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 06:11 AM2017-12-21T06:11:02+5:302017-12-21T06:11:11+5:30

महापालिकेच्या स्थायी समिती सभेत बुधवारी पेव्हिंग ब्लॉकचा विषय गाजला. धोरणासाठी आठ दिवसांपासून कामे बंद केलीत. कुठे आहे धोरण, असा प्रश्न विचारत सदस्यांनी प्रशासनास धारेवर धरले. ‘आरक्षणाचा ताबा घेण्यासाठी पाठविलेल्या नोटिशीत नगरसेवकाचे नाव टाकले जाते. हा कुठला कारभार? प्रशासनाची काही जबाबदारी आहे की नाही? हे खपवून घेतले जाणार नाही, असे स्थायी समितीने प्रशासनास सुनावले.

 Notice to the corporators' names, members of municipal administration held the administration | नगरसेवकांच्या नावे नोटीस , महापालिका प्रशासनाला सदस्यांनी धरले धारेवर

नगरसेवकांच्या नावे नोटीस , महापालिका प्रशासनाला सदस्यांनी धरले धारेवर

googlenewsNext

पिंपरी : महापालिकेच्या स्थायी समिती सभेत बुधवारी पेव्हिंग ब्लॉकचा विषय गाजला. धोरणासाठी आठ दिवसांपासून कामे बंद केलीत. कुठे आहे धोरण, असा प्रश्न विचारत सदस्यांनी प्रशासनास धारेवर धरले. ‘आरक्षणाचा ताबा घेण्यासाठी पाठविलेल्या नोटिशीत नगरसेवकाचे नाव टाकले जाते. हा कुठला कारभार? प्रशासनाची काही जबाबदारी आहे की नाही? हे खपवून घेतले जाणार नाही, असे स्थायी समितीने प्रशासनास सुनावले.
पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या मागील बैठकीत पेव्हिंग ब्लॉकची कामे रखडल्याबद्दल सत्ताधारी नगरसेवकांसह विरोधकांनी प्रशासनावर हल्लाबोल केला होता. त्यावर धोरण तयार करण्याचे काम सुरू आहे, असे कारण प्रशासनाने दिले होते.
आयुक्तांनी शहरातील एका कामाच्या पाहणीत आढळलेल्या त्रुटींवरून शहरातील पेव्हिंग ब्लॉकची कामे थांबविली होती. त्यावर स्थायी समितीत ओरड झाल्यावर कामाची आवश्यकता, कामापूर्वीचे आणि कामानंतरचे छायाचित्र, शहरातील सर्व ब्लॉकचे रंग एक असावेत, जुन्या काढलेल्या ब्लॉकचे आॅडिट असे मुद्दे आयुक्तांनी समितीसमोर मांडले होते. कामे अपूर्ण असतील आणि त्याचा त्रास नागरिकांना होणार असेल अशा कामांच्या फायली माझ्याकडे आणाव्यात, त्यास तातडीने मंजुरी दिली जाईल, असेही आयुक्तांनी यापूर्वीच्या बैठकीत सांगितले
होते.
विकासाला खीळ
एक आठवडा झाला, तरी पेव्हिंग ब्लॉकचे सभेसमोर धोरण न आल्याने सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. आशा शेंडगे यांनी आयुक्तांवरच हल्ला चढविला. त्या म्हणाल्या, ‘‘धोरण करण्याचे कारण प्रशासन दाखवीत आहे. मात्र, याचा त्रास नागरिकांना होत आहे, ही बाब चांगली नाही. धोरणाच्या नावाखाली नागरिकांची अडवणूक होत आहे. आता झोपेतून जागे झालात का? काय धोरण करायचे ते करा, पण कामे का थांबविता? एकतर बजेट उशिरा झाले, उशिरा कामे सुरू झाली आहेत. आणि त्यात आता विकासाची गाडी सुरू झाली, तर आयुक्त खीळ घालण्याचे काम करीत आहेत. आयुक्त नक्की कोणाचे काम करतात? नियम-अटी काय टाकायच्या त्या टाका, आम्ही विकासकामांबद्दल आम्ही प्रशासनाचे ऐकून घेणार नाही, जनतेला आम्हाला उत्तरे द्यावी लागतात. कामेसुरूव्हायला हवीत.’’
श्रावण हर्डिकर म्हणाले, ‘‘ब्लॉक बसविण्यापूर्वी आणि बसविल्यानंतरचे छायाचित्र; त्याचबरोबरच ज्या जागेत ब्लॉक बसवायचे त्याची मंजुरी आहे का, याची माहिती अभियंत्यांनी देणे गरजेचे आहे. तसेच रिफिक्सिंग कामांच्या गुणवत्ता पाहणे गरजेचे आहे. याबाबत सर्वांना सूचना केल्या आहेत. नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे.’’

Web Title:  Notice to the corporators' names, members of municipal administration held the administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.