टपाल खात्यासमोर समस्यांचा डोंगर, अपुरे मनुष्यबळ ठरतेय अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 12:41 AM2018-12-17T00:41:53+5:302018-12-17T00:42:32+5:30

अपुरे मनुष्यबळ : पोस्ट पेमेंट बँकेची अंमलबजावणी पडणार लांबणीवर

The mountains of problems before the postal department | टपाल खात्यासमोर समस्यांचा डोंगर, अपुरे मनुष्यबळ ठरतेय अडचण

टपाल खात्यासमोर समस्यांचा डोंगर, अपुरे मनुष्यबळ ठरतेय अडचण

Next

भोसरी : केंद्र सरकारने घोषित केलेल्या इंडिया पोस्ट पेमेंट बॅँकेची (आयपीपीबी) पिंपरी-चिंचवड शहरात अंमलबजावणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. या योजनेसाठी आवश्यक मोबाइल कर्मचाऱ्यांना पुरवण्यात आले आहेत. मात्र, अपुºया मनुष्यबळाअभावी ही योजना प्रत्यक्षात अमलात कशी आणायची असा प्रश्न टपाल खात्याला पडला आहे.

बॅँक सेवेला ग्राहकांच्या घरी आणण्यासाठी केंद्र सरकारने ‘आयपीपीबी’ची योजना जाहीर केली आहे. पुणे शहरात १ सप्टेंबरपासून या योजनेला सुरुवात झाली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये नोव्हेंबरअखेरपर्यंत योजना सुरू करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, डिसेंबर महिना अर्ध्यावर आला, तरी ही योजना अद्याप सुरू करणे टपाल खात्याला शक्य झाले नाही. नववर्षातच शहरात ही योजना सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पत्रव्यवहाराबरोबरच, विविध परवाने, आधारकार्ड, पासपोर्ट (पारपत्र), धनादेश, मुलाखतीचे कॉल, विविध पार्सल नागरिकांपर्यंत टपाल कर्मचाºयांना पोहोचवावे लागतात. त्यातच आता घरोघरी जात ‘आयपीपीबी’चे खाते उघडण्याचे काम टपाल कर्मचाºयांना करावे लागणार आहे. कर्मचाºयांना नुकतेच याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले. खाते उघडून देण्यासाठी कर्मचाºयांना मोबाइलचे वितरण सुरू करण्यात आले आहे. मात्र, रोजचे टपाल वाटप पूर्ण करायचे की ‘आयपीपीबी’साठी फिरायचे, असा सवाल कर्मचाºयांना सतावत आहे.टपाल खात्याच्या पुणे पूर्व विभागामध्ये पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश होतो. यामध्ये पिंपरी-चिंचवडसह खडकी, हडपसर असा पुण्याचा काही भाग देखील येतो. पिंपरी, चिंचवड, प्राधिकरण, चिखली, हिंजवडी, पिंपरी कॉलनी या ठिकाणी टपाल कार्यालये आहेत. सुमारे २२ लाख लोकसंख्येच्या शहरासाठी अवघे १३६ टपाल कर्मचारी कार्यरत आहेत.

काय आहे आयपीपीबी?
बचत खाते आणि चालू खाते उघडणे, पैसे पाठवणे व हस्तांतरण करणे, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर (डी.बी.टी.), बिल आणि ‘युटिलिटी पेमेंट’ आदी सेवा या माध्यमातून नागरिकांना घरबसल्या मिळणार आहेत. शून्य रकमेवर केवळ आधार क्रमांक आणि ‘बायोमेट्रिक’वर खाते उघडले जाणार असून, टपाल कर्मचारी ही घरपोच सेवा देणार आहेत. खाते उघडल्यानंतर घरबसल्या केवळ संदेश पाठवून पोस्टमनकडून पैसे मागवू, तसेच पैसे भरणे शक्य होणार आहे. ‘डिजिटायझेशन’बरोबरच टपाल खात्यालाही यातून नवसंजीवनी मिळणार आहे.

पिंपरी-चिंचवड टपाल कार्यालयाची सद्य:स्थिती
पत्रांची डिलिव्हरी होणारी केंद्रे : 16
पोस्टमनची संख्या : 136
ग्रामीण डाक सेवक : 34
रिक्त पदे : 120
दैनंदिन एका केंद्रावर येणारी रजिस्टर व स्पीड पोस्ट : 1 ते 2000

Web Title: The mountains of problems before the postal department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.