गहुंजे-शिरगाव रस्त्यावर शंभरहून अधिक खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 12:33 AM2019-01-09T00:33:42+5:302019-01-09T00:34:44+5:30

रस्त्याची झाली दुरवस्था : प्रशासनाचे दुर्लक्ष, ग्रामस्थ त्रस्त

More than 100 potholes on the Ganges-Shiranga road | गहुंजे-शिरगाव रस्त्यावर शंभरहून अधिक खड्डे

गहुंजे-शिरगाव रस्त्यावर शंभरहून अधिक खड्डे

googlenewsNext

गहुंजे : गहुंजे ते शिरगाव या वर्दळीच्या रस्त्यावर विविध ठिकाणी पडलेल्या लहान मोठ्या शंभरहून अधिक खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त झाले असून, विविध ठिकाणी वाहने घसरून अपघात होत आहेत. वाहनांचे नुकसान होत असून, खड्डे चुकविताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. स्थानिक ग्रामस्थ, कामगार, विद्यार्थी व परिसरातील वाहनचालक हैराण झाले आहेत. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

गहुंजे-शिरगाव या रस्त्याची दुरवस्था झाल्याने जिल्हा परिषदेच्या उत्तर विभाग बांधकाम विभागाने तेराव्या वित्त आयोगाच्या निधीतून या लेखाशीर्षानुसार दि. ११ सप्टेंबर २०१४ रोजी दिलेल्या कामाच्या आदेशानुसार सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात २२ लाख ३३ हजार ९४४ रुपये खर्चून डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र गेल्या दोन वर्षांत पावसाळ्यात पडलेल्या लहान-मोठ्या खड्ड्यांमुळे या रस्त्याची पुन्हा दुरवस्था झाली असल्याचे चित्र दिसत आहे. गहुंजे व सांगवडे ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना सोमाटणे फाटामार्गे बाजार हाट करण्यासाठी तळेगाव तसेच तालुक्याचे मुख्यालय वडगाव मावळ येथे शेतीविषयक व इतर कामांकरिता सातत्याने जावे लागते. गहुंजे, सांगवडे भागातील विद्यार्थ्यांना शिरगाव, सोमाटणे, तळेगाव परिसरातील शाळा व महाविद्यालयांत दररोज ये-जा करण्यासाठी गहुंजे-शिरगाव रस्त्याचा वापर करावा लागतो. तळेगाव औद्योगिक विभागात कामावर जाणाºया कामगारांनाही याच रस्त्याचा वापर करावा
लागतो. तसेच सोमाटणे येथील टोल चुकाविण्यासाठी इतर व्यावसायिक वाहने याच रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करीत असल्याने वर्दळ सर्वाधिक आहे. मात्र रस्त्यावर गहुंजे हद्दीत मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे कामगारांना कसरत करावी लागते.

निकृष्ट काम : दर्जेदार कामे करा

सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात डांबरीकरण झालेले असून, या रस्त्यावर वाहनांची वर्दळ सतत वाढत असल्याने या रस्त्याचे रुंदीकरणासह दुरुस्ती व डांबरीकरण काम दर्जेदार होणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. तातडीने सर्व धोकादायक खड्डे बुजाविण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी स्थानिकांतून होत आहे.

तळेगाव औद्योगिक विभागात कामावर जाणाºया कामगारांनाही याच रस्त्याचा वापर करावा लागतो. तसेच सोमाटणे येथील टोल चुकाविण्यासाठी इतर व्यावसायिक वाहने याच रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करीत असल्याने वर्दळ सर्वाधिक आहे. मात्र रस्त्यावर गहुंजे हद्दीत मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे कामगारांना कसरत करावी लागते.त्याना कंपनीत वेळेवर पोचता येत नाही. त्यामुळे त्यांच्या पगारातून कपात होते.

Web Title: More than 100 potholes on the Ganges-Shiranga road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.