उड्डाणपुलाच्या आराखड्यात मेट्रोचा मार्ग  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 02:59 AM2017-08-12T02:59:20+5:302017-08-12T02:59:20+5:30

भक्ती-शक्ती चौकांत १०० कोटी खर्चून उभारण्यात येणाºया उड्डाणपुलाच्या आराखड्यात निगडीपर्यंत नेण्यात येणाºया मेट्रो मार्गाचा समावेश नसल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उजेडात आणला.

 Metro route in the flyover plan | उड्डाणपुलाच्या आराखड्यात मेट्रोचा मार्ग  

उड्डाणपुलाच्या आराखड्यात मेट्रोचा मार्ग  

Next

पिंपरी : भक्ती-शक्ती चौकांत १०० कोटी खर्चून उभारण्यात येणाºया उड्डाणपुलाच्या आराखड्यात निगडीपर्यंत नेण्यात येणाºया मेट्रो मार्गाचा समावेश नसल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उजेडात आणला. त्यानंतर महापालिका प्रशासनाला उपरती झाली असून, महामेट्रोच्या मान्यतेने चौकातील रस्त्याच्या
बाजूने मेट्रो मार्ग नेण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे.
‘उड्डाणपुलाचा मेट्रोला खोडा’ या वृत्तानंतर भविष्यातील मेट्रोचा विचार करून निगडीतील भक्ती-शक्ती उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटर उभारण्यात यावा, अशी मागणी होऊ लागली. यावरून भाजपात दोन मतप्रवाह होते. अखेर महापालिका प्रशासनाने महामेट्रोला त्याविषयीचे पत्र तातडीने दिले. त्यानुसार उड्डाणपुलाच्या खालून नाही तर बाजूने मेट्रो नेणे शक्य होणार असल्याचे महापालिकेस कळविले आहे. महापालिकेने मेट्रोने मागणी केल्यानंतर एकाच दिवसात महामेट्रोने मंजुरी दिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर भक्ती-शक्ती उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटरच्या शंभर कोटींच्या पहिल्या प्रकल्पास मंजुरी दिली. दरम्यान, शहरातून जाणारी मेट्रो निगडीपर्यंत न्यावी, अशी मागणी भाजपासह सर्व विरोधी पक्षांनी केली आहे. भक्ती-शक्ती चौकातील पुलाचे नियोजन मेट्रोपूर्वी झाले. त्यामुळे निगडीपर्यंत मेट्रो न्यायची झाल्यास राष्टÑवादीच्या कालखंडातील आराखड्यात सुधारणा करण्याची गरज आहे. सध्याचा प्रस्तावित पूल झाला आणि त्यानंतर मेट्रो न्यायची झाल्यास जनतेच्या पैशांचा अपव्यय होऊ शकतो. त्यामुळे उड्डाणपुलाचा आराखडा चुकीचा आहे, याबाबत भाजपाचे सरचिटणीस अमोल थोरात यांनीही दाद मागितली होती. मात्र, यावरून भाजपाचे पालिकेतील पदाधिकारी, प्रशासन व भाजपाचे मूळ कार्यकर्ते यांच्यात जुंपली आहे. कोणत्याही परिस्थितीत आराखडा बदलणार नाही, अशी भूमिका एक गटाने घेतली होती. अखेर प्रशासनाने तोडगा काढण्यासाठी महामेट्रोला त्याविषयी कळविले होते.

एका दिवसात महामेट्रोची परवानगी

उड्डाणपुलाचा नियोजनशून्य कारभार मुख्यमंत्र्यांसमोर उजेडात येऊ नये, याची दक्षता महापालिकेने घेतली. दोन आॅगस्टला महाराष्टÑ मेट्रोरेल कॉर्पोरेशनला पत्र पाठविले आणि निगडीपर्यंत मेट्रो नेण्यासाठी पर्यायाची विचारणा केली. सध्याचा आराखडा न बदलता श्रीकृष्ण मंदिराच्या बाजूने मेट्रो नेता येईल का, असा प्रश्न एक आराखडा पाठवून केला होता. त्यावर मेट्रोने संबंधित बदलास एका दिवसांत अनुमती दिली आहे. व्यवस्थापकीय संचालक रामनाथ सुब्रह्मण्यम यांनी महापालिकेला पत्राने त्याविषयी कळविले आहे.

मेट्रोचा विचार करूनच उभारणार पूल
भाजपाचा खुलासा मनसेकडून भक्ती-शक्ती उड्डाणपुलावरून भाजपातील स्थानिक नेत्यांमध्ये जुंपली आहे. चूक मान्य करून त्यात दुरुस्ती करा, अशी भाजपातील काहींची मागणी आहे. मात्र, चूक दुरुस्त करण्याची मानसिकता कोणाचीही नाही. भाजपामधील पदाधिकाºयांमध्ये झालेल्या वादाचा खुलासा मनसेचे गटनेते सचिन चिखले यांनी केला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आता न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार?
निगडी उड्डाणपुलासंदर्भात भूमिका ऐकून घेण्यास महापालिका तयार नाही. आम्ही जनतेच्या पैशांची उधळपट्टी होऊ देणार नाही. याबाबत आम्ही या प्रश्नी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे. ते शनिवारी यावर कोणती भूमिका घेतात. याकडे लक्ष लागले आहे. एका दिवसात मेट्रो रेल कॉर्पोरेशन परवानगी देते, हीच आश्चर्याची बाब आहे. याच्याही चौकशीची मागणी करणार आहोत. आवश्यकता वाटल्यास न्यायालयातही दाद मागितली जाईल, असे भाजपाचे सरचिटणीस अमोल थोरात यांनी सांगितले.

Web Title:  Metro route in the flyover plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.