मुलींसाठी स्वतंत्र अभ्यासिका; पदाधिका-यांचे शिष्टमंडळाला आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 02:52 AM2017-12-15T02:52:40+5:302017-12-15T02:52:52+5:30

येथील सावित्रीबाई फुले स्मारकाच्या इमारतीमध्ये मुलींसाठी यूपीएससी व एमपीएससीच्या अभ्यासासाठी स्वतंत्र अभ्यासिका सुरू करण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने ३ जानेवारीला ही अभ्यासिका सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर नितीन काळजे यांनी दिली.

Independent study for girls; A delegation of the office bearers assured | मुलींसाठी स्वतंत्र अभ्यासिका; पदाधिका-यांचे शिष्टमंडळाला आश्वासन

मुलींसाठी स्वतंत्र अभ्यासिका; पदाधिका-यांचे शिष्टमंडळाला आश्वासन

Next

पिंपरी : येथील सावित्रीबाई फुले स्मारकाच्या इमारतीमध्ये मुलींसाठी यूपीएससी व एमपीएससीच्या अभ्यासासाठी स्वतंत्र अभ्यासिका
सुरू करण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने ३ जानेवारीला ही अभ्यासिका सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर नितीन काळजे यांनी दिली.
सावित्रीबाई फुले स्मारकाच्या इमारतीच्या ठिकाणी महापालिकेच्या विविध विभागांची कार्यालये
सुरू करण्याचा घाट घालण्यात आला होता. मात्र, स्मारक समिती व विविध संघटनांनी या प्रस्तावाला विरोध केला. त्यानंतर महापौर
नितीन काळजे, स्थायी समिती अध्यक्ष सीमा साळवे व गटनेते एकनाथ पवार यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली. त्यानंतर स्मारक समितीच्या शिष्टमंडळाबरोबर महापालिकेचे पदाधिकारी व नगरसेवकांची गुरुवारी बैठक झाली. या वेळी उपमहापौर शैलजा मोरे, नगरसेवक नामदेव ढाके, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, मारुती भापकर आदी उपस्थित होते.

Web Title: Independent study for girls; A delegation of the office bearers assured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.