प्राप्तिकर विभाग त्रासासाठी नव्हे

By admin | Published: November 30, 2015 01:44 AM2015-11-30T01:44:17+5:302015-11-30T01:44:17+5:30

त्रास देण्यासाठी नाही, सोयीसाठी प्राप्तिकर विभाग आहे. १३० कोटी लोकसंख्या असलेल्या देशात फक्त २३ कोटी लोकांकडे पॅन क्रमांक आहे

The income tax department is not for the problem | प्राप्तिकर विभाग त्रासासाठी नव्हे

प्राप्तिकर विभाग त्रासासाठी नव्हे

Next

पिंपरी : त्रास देण्यासाठी नाही, सोयीसाठी प्राप्तिकर विभाग आहे. १३० कोटी लोकसंख्या असलेल्या देशात फक्त २३ कोटी लोकांकडे पॅन क्रमांक आहे. फक्त ४ कोटी लोकच विवरणपत्र दाखल करतात. ही अतिशय गंभीर गोष्ट आहे, असे मत आकुर्डी येथील प्राप्तिकर सह आयुक्त डॉ. महेश आखाडे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर, मुंबई आणि राजगुरूनगर व्यापारी महासंघ यांच्या वतीने राजगुरूनगर येथील महावीरभवन येथे ‘प्राप्तिकर शंका समाधान व व्यापारी मेळावा’ झाला. या वेळी आखाडे बोलत होते.
डॉ. महेश आखाडे म्हणाले, ‘‘प्राप्तिकर खाते देशाच्या विकासासाठी आहे. प्राप्तिकराच्या उत्पन्नातूनच जनतेच्या सोयीचे अनेक उपयुक्त सरकारतर्फे राबविले
जातात. त्यामुळे प्राप्तिकर विवरण पत्र भरून योग्य तो कर भरण्याची आपली केवळ कायदेशीर जबाबदारी नसून, ते राष्ट्रीय कर्तव्य आहे. प्राप्तिकर
खाते करदात्यांना त्रास देण्यासाठी नाही, तर त्यांच्या सेवेसाठी आणि सोयीसाठी आहे. ’’
मुख्य संयोजक अशोक पगारिया यांनी मेळाव्याची भूमिका विशद केली. दिलीप कटारे यांनी स्वागत केले. चंदन खारीवाल यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला व मोतीलाल गदिया यांनी आभार मानले. प्रा. अविनाश कोहीनकर यांनी सूत्रसंचालन केले.
या वेळी व्यापाऱ्यांच्या प्रश्नांना डॉ. आखाडे यांनी उत्तरे दिली. या वेळी विजय भन्साळी, राहुल तांबे, संतोष बोथरा, प्रदीप कासवा, विभूते, प्रकाश गादिया आदी उपस्थित होते. विनय लोढा, विकास सुभेदार, अरुण जाजू यांनी संयोजन केले.(प्रतिनिधी)

Web Title: The income tax department is not for the problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.