लाख रुपये दे नाहीतर व्हिडीओ व्हायरल करेन; तोतया पोलिसांची स्पा सेंटर चालकांला धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 04:03 PM2022-03-08T16:03:28+5:302022-03-08T16:03:43+5:30

पोलीस असल्याचे सांगून एका तरुणाने स्पा मसाज सेंटर चालकाकडे एक लाखाची खंडणी मागितली

If you don't pay Rs 1 lakh, the video will go viral; Totaya police threaten spa center operators | लाख रुपये दे नाहीतर व्हिडीओ व्हायरल करेन; तोतया पोलिसांची स्पा सेंटर चालकांला धमकी

लाख रुपये दे नाहीतर व्हिडीओ व्हायरल करेन; तोतया पोलिसांची स्पा सेंटर चालकांला धमकी

Next

पिंपरी : पोलीस असल्याचे सांगून एका तरुणाने स्पा मसाज सेंटर चालकाकडे एक लाखाची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास आरोपीकडे असलेले व्हिडिओ व्हायरल करण्याची त्याने धमकी दिली. तसेच त्यातील काही पैसे स्वीकारले. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित तरुणाला अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि. ७) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास कोकणे चौक पिंपळे सौदागर येथे घडली.

विशाल कैलास जोंजाळे (वय २८, रा. शिंदे वस्ती, मारुंजी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी अविनाश शांताराम शिंदे (वय २६, रा. लोहगाव पुणे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे यांचा कोकणे चौक पिंपळे सौदागर येथे स्पा मसाज सेंटर आहे. विशालने त्यांना पोलीस असल्याचे सांगितले. त्यानंतर स्पा मसाज सेंटर मध्ये झालेल्या गैरप्रकाराबाबत कार्यवाही न करण्यासाठी शिंदे यांच्याकडे एक लाख रुपयांची मागणी केली. तसेच पैसे न दिल्यास स्वतःकडे असलेले व्हिडिओ व्हायरल करण्याची त्याने धमकी दिली. स्पा मसाज सेंटरची आणि त्यामध्ये काम करणाऱ्या मुलींची बदनामी करेल अशी देखील आरोपीने धमकी दिली. त्या आधारे त्याने स्पा मसाज सेंटर मध्ये पाच हजार रुपये रोख रक्कम, ऑनलाइन माध्यमातून एक हजार रुपये स्वीकारले. त्यानंतर ७० हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास पोलिसांना सांगून कार्यवाही करण्याची व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत विशालने खंडणी मागितली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: If you don't pay Rs 1 lakh, the video will go viral; Totaya police threaten spa center operators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.