वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस

By Admin | Published: May 11, 2016 12:34 AM2016-05-11T00:34:39+5:302016-05-11T00:34:39+5:30

सोसाट्याचा वारा, ढगांचा गडगडाट, विजेच्या कडकडाटांसह पिंपरी-चिंचवड शहर परिसरात सोमवारी मध्यरात्री अवकाळी पाऊस झाला. सुमारे तासभर जोरदार सरी बरसल्या.

Heavy rain with windy wind | वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस

वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस

googlenewsNext

पिंपरी : सोसाट्याचा वारा, ढगांचा गडगडाट, विजेच्या कडकडाटांसह पिंपरी-चिंचवड शहर परिसरात सोमवारी मध्यरात्री अवकाळी पाऊस झाला. सुमारे तासभर जोरदार सरी बरसल्या. अचानक आलेल्या पावसाने विद्युतपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे उकाड्याचा त्रास शहरवासीयांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागला.
यंदाच्या उन्हाळ्यात मागील आठवड्यात पारा ४१ अंश सेल्सिअस गेला होता. गेल्या तीन दिवसांपासून वातावरणात बदल होत आहे. सोमवारी दुपारी उकाडा जाणवत होता. दुपारी तीननंतर भोसरी, तळवडे, देहूरोड, रावेत, किवळे परिसरात ढग भरून आले होते. काही ठिकाणी हलक्याशा सरी बरसल्या होत्या. सायंकाळी आकाश निवळले होते. तरीही वातावरणात उकाडा जाणवत होता. रात्री दीडच्या सुमारास शहरातील पिंपरी, चिंचवड, निगडी, आकुर्डी, चिंचवड, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, दापोडी, थेरगाव, सांगवी, भोसरी, वाकड, रावेत, किवळे परिसरात जोरदार वारा वाहू लागला.
ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट होऊ लागला. त्यानंतर जोरदार सरी बरसण्यास सुरुवात झाली. सुमारे अर्धा ते एक तास वेळेत काही ठिकाणी हलक्या, तर काही ठिकाणी जोरदार सरी बरसल्या. वारा एवढा जोरात होता की, काही ठिकाणी झाडांच्या फांद्या दुचाकी वाहनांवर पडल्या. (प्रतिनिधी)
>चिखली : सोमवारी रात्री दीडच्या सुमारास झालेल्या पावसामुळे शहरातील ठिकठिकाणच्या रस्त्यांवर डबकी साचली. काही ठिकाणी रस्ते निसरडे झाल्याने वाहने घसरून अपघात झाले. चिखलीतील घरकुल प्रकल्पाजवळ मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास खासगी कंपनीच्या दोन बसगाड्या पलटी झाल्या. या अपघातात बसगाड्यांचे नुकसान झाले. मात्र, कोणीही जखमी झाले नाही.चिखलीतील घरकुलाजवळ शिवतेजनगरच्या दिशेने जात असताना, एमएच -१४ सीडब्ल्यू ९९७२ या क़्रमांकाची बस घसरून पलटी झाली. तर दुसरी (एमएच १४ केक्यू ७९४९ या क्रमांकाची बस घरकुल चौकातून भाजी मंडईकडे जात असताना पलटी झाली. चार चाके वर, टप खालच्या बाजूस अशा स्थितीत बसगाड्या उलटल्यामुळे मोठे नुकसान झाले. सकाळच्या वेळी वर्दळ कमी असताना अपघात झाले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
> उकाड्याचा त्रास
जोरदार पाऊस सुरू झाल्याने, तसेच जोरदार वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. पावसामुळे काही वेळ गारवा निर्माण झाला असला, तरी वीज खंडित झाल्याने उकाड्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागला. चिंचवड परिसरातील काही भागात सकाळपर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता.
पिकांना झळ
शहराच्या ग्रामीण भागात ऊस, उन्हाळी बाजरी, गव्हाचे पीक जोमात आहे, तर काही पिके काढणीला आली आहेत. सोमवारी झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले. उन्हाळ्यात विटा तयार करण्याचे काम सुरू आहे. रात्री अचानकपणे आलेल्या पावसाने वीट कारखानदारांचे नुकसान झाले.
उकाडा कायम, हलक्याशा सरी
मंगळवारीही सकाळी दहा वाजल्यापासून वातावरणात उकाडा जाणवत होता. सायंकाळी चारनंतर आकाशात ढग जमू लागले. सातनंतर जोरात पाऊस पडेल, असे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, काही भागात भुरभुर झाली. मध्यान्हरात्री अचानक वातावरण बदलल्याने नागरिक काही काळ धास्तावून गेले होते.
> शहरातील वीजपुरवठा खंडित
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर परिसरात मंगळवारी पहाटे दीड वाजताच्या सुमारास झालेल्या वादळी पावसामुळे विविध भागात वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली. काही भागांतील वीज सकाळपर्यंत पूर्ववत झाली नव्हती. हीच स्थिती मावळ तालुक्यातील काही गावात होती.
शहरातील पिंपरी गाव, दापोडी, सांगवी, पिंपळे गुरव, दापोडी, बोपखेल, गावडे कॉलनी परिसर, दत्तनगर, आंबेडकर चौक, वाकड रोड, अजमेरा कॉलनी, एम्पायर इस्टेट परिसर, थेरगाव, संत तुकारामनगर, भोसरी, आकुर्डी, चऱ्होली, मोशी, भोसरी एमआयडीसी आदी भागांतील वीज वादळी पावसामुळे खंडित झाला होता. तारावर मोठे झाडे आणि फांद्या पडल्याने त्या तुटून शॉर्टसर्किटने वीज गेली. वादळी वारा, त्यात ढगांच्या कडकडाटाने जोरदार पाऊस पडला. त्यात वीज गेल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले. पाऊस कमी होताच उकाडा वाढला. वीज नसल्याने पंखे, कुलर आणि वातानुकूलित यंत्रणा बंद पडली. त्यामुळे नागरिकांची उकाड्याने प्रचंड गैरसोय झाली. त्याच डासांनी नागरिक हैराण झाले.
(प्रतिनिधी)

Web Title: Heavy rain with windy wind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.