पिंपरी चिंचवड महापालिकेकडून आरोग्यविषयक तक्रारींसाठी हेल्पलाईल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 07:00 PM2018-11-06T19:00:23+5:302018-11-06T20:07:52+5:30

महानगरपालिकेच्या वतीने शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आरोग्य विषयक प्रश्नांसाठी सारथी हेल्पलाईन आणि व्हॉटस्अ‍ॅपवर सुविधा उपलब्ध करून दिली आहे

health helpline for pimpari chinchwad citizens | पिंपरी चिंचवड महापालिकेकडून आरोग्यविषयक तक्रारींसाठी हेल्पलाईल

पिंपरी चिंचवड महापालिकेकडून आरोग्यविषयक तक्रारींसाठी हेल्पलाईल

Next

पिंपरी : महानगरपालिकेच्या वतीने शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आरोग्य विषयक प्रश्नांसाठी सारथी हेल्पलाईन आणि व्हॉटस्अ‍ॅपवर सुविधा उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.

    महापालिकेच्या अ, ब, क, ड, इ, फ, ग व ह क्षेत्रिय कार्यालयांतर्गत आरोग्य विभागामार्फत शहरातील दैंनंदिन स्वच्छताविषयक कामे केली जातात. त्यानुसार रस्ते साफसफाई, उघड्यागटर्सची साफसफाई, घरोघरचा कचरा गोळा करणे व त्याची वाहतूक करणे, परिसरातील कचरा ढिग उचलणे आणि कचरा कुंड्याची स्वच्छता केली जाते. 

    खुल्याजागेत कचरा जाळणेस प्रतिबंध करणे, कुत्रे,मांजर, डुक्कर,उंदीर, घुशी, पक्षी आदी मृत प्राण्यांची विल्हेवाट लावणे, सामुदायिक व सार्वजनिक स्वच्छतागृहांची साफसफाई करणे, सार्वजनिक ठिकाणी लघवी करणे, उघड्यावर मल विसर्जन करणेस प्रतिबंध करणे, खाजगी सेफ्टीक टँक उपसण्याची कामे केली जातात. तसेच स्वच्छ भारत अभीयान अंतर्गत वैयक्तीक स्वच्छतागृह अनुदान देणे, डासप्रतिबंधक पाययोजना करणे,प्लास्टीक बंदी कारवाई केली जाते.


    अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे म्हणाले,  शहर स्वच्छ ठेवणेसाठी आरोग्यविभागमार्फेत विविध कामे आणि सुविधा पुरविल्या जातात. नागरिकांनी वॉर्डमधील आरोग्य विषयक कामकाजा संदर्भातील माहिती तसेच तक्रारी बाबतमनपाच्या सारथी हेल्पलाईन क्रमांक 8888006666 किंवा आरोग्य विभाग व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक 7745065999 हा नागरिकांच्या सेवेसाठी दिला आहे.  तसेच क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य अधिकाऱ्यांशीही संपर्क साधता येणे श्क्य होणार आहे.’’

Web Title: health helpline for pimpari chinchwad citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.