ताथवडेत दोन चिमुकल्यांचा खून करत पित्याची आत्मह्त्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2018 17:24 IST2018-08-18T15:44:18+5:302018-08-18T17:24:06+5:30

ताथवडे येथील नृसिंह कॉलनीत जन्मदात्या पित्यानेच पोटच्या दोघा मुलांना गळफास लावला, त्यात मुले आणि पित्याचा मृत्यू झाला. 

Father's suicide by killing children at Wakad | ताथवडेत दोन चिमुकल्यांचा खून करत पित्याची आत्मह्त्या

ताथवडेत दोन चिमुकल्यांचा खून करत पित्याची आत्मह्त्या

ठळक मुद्देआत्महत्तेचे कारण अद्याप अस्पष्ट

पिंपरी-चिंचवड : ताथवडे येथील नृसिंह कॉलनीत जन्मदात्या पित्यानेच पोटच्या दोघा मुलांचा गळा आवळून खून करत स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी (दि १७) रोजी दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. दीपक बर्मन (वय ३५, रा. नृसिंह कॉलनी ताथवडे, मूळ- पश्चिम बंगाल) असे आत्महत्या केलेल्या पित्याचे नाव असून शुभम दीपक बरमन (वय १०) व रूपंम दीपक बरमन (वय ८) असे खून झालेल्या मुलांची नावे आहेत. 
        याबाबत वाकड ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, बर्मन कुटुंबीय ताथवडे येथे संजय ढगे यांच्या खोलीत भाड्याने वास्तव्यास होते. दीपक बर्मन हा सुरक्षा रक्षकाचे काम करायचा तर त्याची पत्नी मालती ह्या देखील जवळच्याच कंपनीत नोकरी करतात. दुपारी घरी शाळेतून आलेली दोन व दीपक हे तिघेच होते. दरम्यान, आधी दीपक याने आपल्या दोन्ही मुलांचा गळा आवळून खून केला आणि नंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी एक वाजता पत्नी मालती ह्या घरी जेवायला आल्या असता त्यांना पती दीपक यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. बाजूला चिमुकली मुले निपचित पडली होती हे पाहून भांबावलेल्या मालती यांनी आरडा ओरड करताच शेजारी जमा झाले. यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. दोन्ही मुलात त्राण असून ते जगतील या आशेने त्यांना तत्काळ पिंपरीतील वाय सी एम रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
       मोठा शुभम आणि लहान रूपंम हे दोघेही येथील बाल सेवा इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये सहावी व चौथीत शिकत होती.  दोन्हीही गोड मुलांचा जन्मदात्या पित्यानेच खून केल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि सर्वांचे मन सुन्न झाले. जो तो या मुलांसाठी हळहळ व्यक्त करत होता. आत्महत्येमागे नेमके कारण काय ? याचा पोलीस शोध घेत आहेत.

Web Title: Father's suicide by killing children at Wakad