मासेमारीसाठी होतोय स्फोटकाचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 01:30 AM2019-02-09T01:30:37+5:302019-02-09T02:13:07+5:30

पवना नदीपात्रातील केजुबाई बंधाऱ्यामध्ये मृत मासे आढळल्याने शहरातील अस्वच्छ नदीचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरातील अनेक कंपन्यांमधून प्रक्रिया न करता सांडपाणी थेट नदीमध्ये सोडले जाते.

Explosive uses for fishing | मासेमारीसाठी होतोय स्फोटकाचा वापर

मासेमारीसाठी होतोय स्फोटकाचा वापर

Next

पिंपरी - पवना नदीपात्रातील केजुबाई बंधाऱ्यामध्ये मृत मासे आढळल्याने शहरातील अस्वच्छ नदीचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरातील अनेक कंपन्यांमधून प्रक्रिया न करता सांडपाणी थेट नदीमध्ये सोडले जाते. तसेच अलीकडे मासेमारीसाठी स्फोटकांचा वापर केला जात आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाणी प्रदूषित होऊन पर्यावरणाचा ºहास होत आहे. शहरातील पर्यावरणप्रेमींकडून याबाबत हळहळ व्यक्त होत आहे.
मासेमारी करण्यासाठी प्रामुख्याने गळ किंवा जाळ्याचा वापर केला जातो. मात्र अलीकडे मोठ्या प्रमाणावर मासे मिळवण्यासाठी मासेमारी करणारे नवीन पद्धतीचा अवलंब करताना दिसून येत आहे. त्यासाठी धोकादायक अशा रसायनांचा वापर केला जातो. खोल पाण्यातील मासे पकडण्यासाठी पाण्यामध्ये रसायन सोडले जाते. त्यामुळे पाण्यातील आॅक्सिजन विरळ होतो. अशा वेळी खोल पाण्यातील मासे श्वास घेण्यासाठी पाण्याच्या वर येतात. पाण्यामध्ये स्फोट करूनही मासेमारी केली जाते. गव्हाच्या कणकेमध्ये भुलीची पावडर टाकली जाते. मासे ती गोळी खातात. परिणामी माशांचा मृत्यू होतो.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, महापालिका पर्यावरण विभागाचे अधिकारी, रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडी यांचे पदाधिकारी आणि पर्यावरणप्रेमी संस्था यांनी एकत्रित येऊन माशांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी पाहणी केली. पाण्याचे नमूने प्रदूषण मंडळाने जमा केले असून, ते तपासणीसाठी पाठविले आहेत. तसेच मृत मासे विच्छेदनासाठी पाठविले आहेत. प्रदूषित पाणी आणि शवविच्छेदन अहवालानंतर यामागील कारण स्पष्ट होणार आहे.

स्फोटाद्वारे मासेमारी करण्याची नवीन प्रक्रिया आली आहे. ती घातक आहे. त्यामुळे संपूर्ण नदीपात्राचे पाणी प्रदूषित होत आहे. या पद्धतीने मासेमारी केलेले मासे माणसांच्या आरोग्यासाठी घातक आहेत. यातून आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. हा संभाव्य धोका प्रशासनाने ओळखून अशा प्रकारे मासेमारी करणाºयांवर कडक कारवाई केली पाहिजे.
- सोमनाथ मुसुडगे, अध्यक्ष, रानजाई संस्था, देहू

नदीपात्राच्या पाहणीदरम्यान अनेक नाले, मलनिस्सारण वाहिन्या फुटलेल्या अवस्थेत आढळून आल्या आहेत. जागोजागी फुटलेल्या वाहिन्यांमुळे सांडपाणी एसटीपीपर्यंत प्रक्रिया होण्यासाठी पोहचत नाही याबाबतचा अहवाल तयार करण्यात आला असून, पुढील कारवाईसाठी वरिष्ठांना देण्यात आला आहे.
- हसन मुल्ला, आरोग्य निरीक्षक, पर्यावरण विभाग

१सांडपाण्यामुळे नदीपात्रामध्ये दूषित पाण्याचा विसर्ग ताथवडे गाव, पुनावळे हद्द, वाल्हेकरवाडी येथून निर्माण होणारे घरगुती सांडपाणी नदीमध्ये नाल्याद्वारे प्रक्रिया न करता सोडण्यात येते. हे नाले नदीपात्रात ज्या ठिकाणी मिळतात तेथील पाण्याचा सामू ६ ते ७ आढळून आला आहे. या ठिकाणी महापालिकेची कोणतीही सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा कार्यरत नाही.
२तपासाबाबत पर्यावरण प्रेमींची साशंकता प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिकेच्या पर्यावरण विभागाने मृत माशांची कारणे शोधताना घरगुती सांडपाण्यामुळे मासे मृत झाल्याचे प्राथमिक अहवालात म्हटले आहे. औद्योगिक क्षेत्रातील पाणी सध्यातरी यासाठी कारणीभूत नाही, असे मत अधिकाºयांनी मांडले आहे.

Web Title: Explosive uses for fishing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.