व्यावसायिकांकडून अतिक्रमण, महापालिकेचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 12:30 AM2018-11-15T00:30:45+5:302018-11-15T00:31:11+5:30

महापालिकेचे दुर्लक्ष : पादचाऱ्यांची सुरक्षा धोक्यात

 Encroachment by the professionals, ignorance of the corporation | व्यावसायिकांकडून अतिक्रमण, महापालिकेचे दुर्लक्ष

व्यावसायिकांकडून अतिक्रमण, महापालिकेचे दुर्लक्ष

Next

पिंपळे गुरव : पिंपळे सौदागर येथील स्वराज चौकातील पिंपळे गुरवकडे जाणाऱ्या पदपथावर खासगी व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्यामुळे पदपथ गिळंकृत होत आहेत. त्यामुळे पादचाºयांना भर रस्त्यावरून ये-जा करावी लागत आहे. परिणामी त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

महापालिकेने लाखो रुपये खर्च करून बीआरटीसह रस्त्याचे रुंदीकरण केले आहे. नागरिकांना सुरक्षित पायी चालण्यासाठी पदपथ बनविले. हे पदपथ नागरिकांसाठी की व्यावसायिकांसाठी, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. खासगी व्यावसायिकांनी या पदपथांवर अतिक्रमण केले आहे. या पदपथांवर टायर पंक्चर, चहाची दुकाने, चष्मा विक्रेते, नीरा विक्री आदींनी अतिक्रमण केले आहे. व्यावसायिकांनी आपल्या दुकानाचे फलक पदपथावर मांडले आहेत. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने पाहणी करून कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

अतिक्रमण : पिंपळे सौदागर येथील स्वराज चौकातील पिंपळे गुरवकडे जाणाºया मार्गावरील पदपथावर खासगी व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे.
 

Web Title:  Encroachment by the professionals, ignorance of the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.