असला गोंधळ नको रे बाबा...! गोंधळातच पिंपरी महापालिकेची सभा तहकूब 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 09:32 PM2018-10-11T21:32:07+5:302018-10-11T21:38:45+5:30

'आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हायं' या गाण्याने सभेला सुरुवात झाली....आणि मग...भटकी कुत्री, डुकरे, निलंबन, बढती रद्द अशा अभूतपर्व गोंधळाने अभिरुप महासभा गाजली.

Do not want to be confusion ... Baba ...! The meeting stop of Pimpri Municipal Corporation | असला गोंधळ नको रे बाबा...! गोंधळातच पिंपरी महापालिकेची सभा तहकूब 

असला गोंधळ नको रे बाबा...! गोंधळातच पिंपरी महापालिकेची सभा तहकूब 

Next
ठळक मुद्देनगरसेवकांच्या भूमिकेत अधिकारी तर अधिका-यांच्या भूमिकेत नगरसेवकमहापौर राहुल जाधव आयुक्त तर, आयुक्त श्रावण हार्डीकर महापौरांच्या भूमिकेत महासभा अनिश्चित काळासाठी तहकूब

पिंपरी चिचवड : भटकी कुत्री, डुकरे, निलंबन, बढती रद्द अशा अभूतपर्व गोंधळाने अभिरुप महासभा गाजली. पवना धरण शंभर टक्के भरले असूनही शहरवासियांना मुबलक पाणी मिळत नाही. त्यासाठी थेट ढगामधून स्ट्राद्वारे शुद्ध पाणी आणण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच बीआरटी आणि मेट्रोच्या कामामुळे अरुंद रस्ते झाल्याने पालिका कर्मचा-यांना कार्यालयात येताना जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिका-यांना घरी बसून काम करु देण्याचा निर्णय घेतला आहे. 
महापालिका वर्धापन दिनानिमित्त अभिरुप महासभा झाली. भटकी कुत्री सभागृहात सोडल्याने प्रचंड गोंधळ झाला. त्यामुळे महासभा अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली. निलंबन, बढती रद्द अन् गोंधळाने अभिरुप महासभा चांगलीच गाजली. 
 त्यात नगरसेवकांच्या भूमिकेत अधिकारी तर अधिका-यांच्या भूमिकेत नगरसेवक होते. महापौर राहुल जाधव यानी आयुक्तांची भूमिका बजावली. (जाधव यांनी आयुक्तांसारखीच वेषभूषा केली)तर, आयुक्त श्रावण हार्डीकर यानी महापौरांच्या भूमिका वठविली. उपमहापौर सचिन चिंचवडे, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड या अतिरिक्त आयुक्त, सभागृह नेते एकनाथ पवार नगरसचिवांच्या भूमिकेत होते. मनसेचे गटनेते सचिन चिखले यांनी चोपदार म्हणून भूमिका पार पाडली. तर, प्रभारी अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर उपमहापौर, लेखापाल जितेंद्र कोळंबे स्थायी समिती अध्यक्ष, सह शहर अभियंता प्रवीण तुपे सभागृह नेत्याच्या, तर अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी विरोधी पक्ष नेत्याची भूमिका साकारली.
'आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हायं' या गाण्याने सभेला सुरुवात झाली. अभिरुप महासभेच्या विषयपत्रिकेवर पाच विषय होते. त्यापैकी दोन विषय मंजूर केले. सभेला सुरुवात होताच नगरसचिवाच्या भुमिकेत असलेल्या एकनाथ पवार यांनी नगरसेवक काम करत नसल्याने त्यांना निष्कासित करावे, महापालिकेची इमारत विकण्याचा विषय वन-के खाली दाखल करुन घेतला. नगरसेवकाच्या भूमिकेत असलेल्या उल्हास जगताप यांनी नगरसचिवांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. 
अग्निशामक अधिका-यांच्या वेशभूषेतील दत्ता साने म्हणाले, सल्लागार नागपूरवरुन येत आहे. त्यांच्या खुलाशावर समाधान न झाल्याने आयुक्तांच्या भुमिकेत असलेले राहुल जाधव म्हणाले, शहरवासियांसाठी उजनी धरणातून पाणी आणले जाईल. उजनी धरणाचे पाणी चांगले आहे. सर्वांना समान पाणीपुरवठा केला जाईल. मी पारदर्शकपणे काम करत असून सत्ताधा-यांना पैसे कमवून देत नाही. मी कोणाला पैसे कमवून दिले आहेत. त्याचे विरोधकांनी पुरावे द्यावेत, असे खुले आव्हानही त्यांनी केले.विरोधी पक्षनेते दिलीप गावडे यांनी पाण्याचा प्रश्न गंभीर असून तो प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही सत्ताधा-यांसोबत असल्याचे सांगितले. सभागृह नेते तुपे म्हणाले, शहरावर जास्तीत-जास्त ढग आणण्यासाठी आमचे केंद्रापासून प्रयत्न सुरु आहेत. श्रावण हर्डीकर म्हणाले, सगळ्यांना पाणी पाजणारच, ढग उभे करणार, कोणाला तहानलेले ठेवणार नाही. दरम्यान, मुख्यलेखापरिक्षक आशा शेंडगे यांना समाधानकारक खुलासा न करता आल्याने आयुक्त जाधव यांनी त्यांची बढती रद्द केली. 
आयुक्तांच्या उत्तरावर समाधान न झाल्याने नगरसेवक ओंभासे, भोजने यांनी महापौरांच्या आसनासमोर धाव घेत जोरदार घोषणाबाजी केली. कागदे फिरविली. त्यामुळे महापौर हर्डीकर यांनी ओंभासे यांना तीस वर्षांसाठी निलंबित केले. त्यामुळे विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला. गोंधळामुळे महापौर हर्डीकर यांनी सभा अनिश्चित काळासाठी तहकूब केली.

 

Web Title: Do not want to be confusion ... Baba ...! The meeting stop of Pimpri Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.