अनधिकृत बांधकामांचे समर्थन नको : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 08:58 PM2019-01-09T20:58:49+5:302019-01-09T20:59:36+5:30

 पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत बांधकामे होऊ दिली नाही पाहिजेत. अनधिकृत बांधकामचे समर्थन करणे चुकीचे आहे असे सांगत शहरातील  शास्तीकराचा प्रश्न आगामी 15 दिवसांत मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

Do not support unauthorized constructions: Chief Minister Devendra Fadnavis | अनधिकृत बांधकामांचे समर्थन नको : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

अनधिकृत बांधकामांचे समर्थन नको : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

googlenewsNext

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत बांधकामे होऊ दिली नाही पाहिजेत. अनधिकृत बांधकामचे समर्थन करणे चुकीचे आहे असे सांगत शहरातील  शास्तीकराचा प्रश्न आगामी 15 दिवसांत मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच पवना बंदिस्त जलवाहिनीचा प्रकल्प मार्गी लागण्याबाबत मी स्वतः लक्ष घातले आहे. मावळातील शेतकऱ्यांशी चर्चा करून, त्यांच्या समस्या मार्गी लावून जलवाहिनीचा प्रश्न सामंजस्याने सोडविणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे उभारण्यात येणा-या  पंतप्रधान आवास योजना, स्मार्ट सिटीतील कामांचे  त्यांच्या हस्ते 'ई-भूमिपुजन' करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. 

                  चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झालेल्या कार्यक्रमाला पालकमंत्री गिरीश बापट, महापौर राहुल जाधव, भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप,  महेश लांडगे, गौतम चौबुकस्वार, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर,  यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते. 

Web Title: Do not support unauthorized constructions: Chief Minister Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.