चिंचवडगाव : पैशांची मागणी करत अल्पवयीन मुलाची रस्त्यात अडवून दोघांना मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 07:13 PM2022-06-02T19:13:15+5:302022-06-02T19:14:18+5:30

रात्री साडेअकराच्या सुमारासची घटना...

chinchwadgaon minor boy was stopped on the road demanding money and beaten up | चिंचवडगाव : पैशांची मागणी करत अल्पवयीन मुलाची रस्त्यात अडवून दोघांना मारहाण

चिंचवडगाव : पैशांची मागणी करत अल्पवयीन मुलाची रस्त्यात अडवून दोघांना मारहाण

Next

पिंपरी : पैशांची मागणी करत अल्पवयीन मुलाने दोन जणांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच त्यांचे खिसे जबरदस्तीने तपासून चोरी करण्याचा प्रयत्न केला. चिंचवडगाव येथे मंगळवारी (दि. ३१) रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. 

मनोहर भागवत बोतरे (वय ४९, रा. येलवाडी, ता. खेड) यांनी या प्रकरणी बुधवारी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी १७ वर्षीय अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा हॉटेल व्यवसाय आहे. फिर्यादीचे कामगार अधीर कृष्णा बिसवास आणि सुमन इन्द्रबहादुर थापा यांना अल्पवयीन मुलाने अडवले. त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. तसेच शिवीगाळ करून त्यांना मारहाण केली. त्यानंतर त्यांचे खिसे जबरदस्तीने तपासून चोरी करण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: chinchwadgaon minor boy was stopped on the road demanding money and beaten up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.