पिंपरीत पिस्तुल व जिवंत काडतुसांसह दोघांना अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 02:47 PM2018-08-08T14:47:18+5:302018-08-08T14:48:44+5:30

देशी बनावटीचे एक पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसांसह दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे.

both arrested with pistols and the live cartridges | पिंपरीत पिस्तुल व जिवंत काडतुसांसह दोघांना अटक 

पिंपरीत पिस्तुल व जिवंत काडतुसांसह दोघांना अटक 

Next
ठळक मुद्देएक देशी बनावटीचे पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त

पिंपरी : देशी बनावटीचे एक पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसांसह दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास पिंपरी पोलिसांनी भाटनगर येथे केली. विकास कांबळे (वय २८, रा. पत्राशेड, पिंपरी) आणि अमीर उर्फ राजा युसुफ शेख (वय १८, रा. पिंपरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीतील भाटनगर येथे दोनजण दुचाकीवरून आले असून त्यांच्याजवळ पिस्तुल असल्याची खात्रीशीर माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पिंपरी पोलिसांनी सापळा रचून पोलीस पथक तेथे गेले. भाटनगर कमानीजवळ उभे असलेल्या विकास आणि अमीर या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. यावरून दोघांना अटक करण्यात आली आहे. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: both arrested with pistols and the live cartridges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.