बो-हाडेवाडीच्या फेरप्रस्तावाचा तिढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 01:37 AM2018-08-07T01:37:20+5:302018-08-07T01:37:41+5:30

महापालिकेच्या पंतप्रधान आवास योजनेतील बो-हाडेवाडी आवास प्रकल्पाचा फेरप्रस्ताव आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्थायी समितीच्या बुधवारी (दि. ८) होणाऱ्या बैठकीपुढे सादर केला आहे.

Bo-Hadevadi's refund proposal | बो-हाडेवाडीच्या फेरप्रस्तावाचा तिढा

बो-हाडेवाडीच्या फेरप्रस्तावाचा तिढा

Next

पिंपरी : महापालिकेच्या पंतप्रधान आवास योजनेतील बो-हाडेवाडी आवास प्रकल्पाचा फेरप्रस्ताव आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्थायी समितीच्या बुधवारी (दि. ८) होणाऱ्या बैठकीपुढे सादर केला आहे. यामध्ये प्लॅस्टरचा दर्जा बदलून प्रशासन व ठेकेदाराने प्रकल्पाच्या खर्चात तब्बल साडेअकरा कोटी रुपयांची बचत होणार आहे. मात्र, या बदलामुळे आवास प्रकल्पावरून सुरू असलेला तेढ आणखी वाढण्याची शक्यता आहे. बोºहाडेवाडीप्रमाणे या आधीच्या चºहोली व रावेत प्रकल्पांच्या खर्चातही घट होण्याची मागणी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून होऊ शकते.
महापालिकेकडून शहरात आवास प्रकल्पातून परवडणारी घरे बांधण्यात येत आहेत. त्या अंतर्गत बोºहाडेवाडीतील गृहप्रकल्पाच्या १२३ कोटी ७८ लाख ३७ हजार ८९४ रुपये खर्चाचे काम ठेकेदार एस. जे. कॉन्ट्रॅक्टर्सला देण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने ठेवला होता.
दरम्यान, या प्रकल्पाचे दर हे पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या गृहप्रकल्पापेक्षा अधिक असल्याने कारण देत स्थायी समितीने फेरप्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आयुक्तांना दिले होते.
बोºहाडेवाडीमध्ये १ हजार २८८ आणि प्राधिकरणाकडून सेक्टर क्रमांक १२ येथे २ हजार ५७२ सदनिका बांधण्यात येत आहेत. ठेकेदारºया निविदेनुसार आणि इन्फ्रास्ट्रक्चर कामांचा समावेश करून पालिकेचा प्रतिसदनिका दर ९ लाख ९९ हजार ४६५ रुपये आहे, तर प्राधिकरणाचा प्रतिसदनिका दर ८ लाख २५ हजार १४८ रुपये आहे. तब्बल १ लाख ७४ हजार ३१७ रुपयांनी पालिकेचा दर वाढीव आहे. महापालिकेचा प्रतिचौरस फुटाचा दर ३ हजार ९६ रुपये, तर प्राधिकरणाचा २ हजार
५९९ रुपये आहे. या तुलनेत पालिकेचा दर तब्बल ४९६ रुपयांनी जास्त होता. महापालिकेची इमारत १४ मजली, तर प्राधिकरणाची इमारत ११ मजली आहे.
असे वाचणार कोट्यवधी
प्राधिकरण इमारतीसाठी भिंतीच्या प्लॅस्टरसाठी वॉलकेअर पुट्टीचा समावेश आहे. तर, पालिका जिप्सम प्लॅस्टरचा वापर करणार आहे. तसेच,महापालिकेने अ‍ॅल्युमिनियम खिडकी व प्राधिकरणाने एमएस खिडकी वापरली आहे. तसेच, महापालिका निविदेमध्ये नामफलक, सदनिकाधारकांची एकत्रित नामफलक, लेटर बॉक्स, इमारतीचे नाव या खर्चाचा समावेश आहे. या बाबी फेरप्रस्तावामध्ये नमूद केल्या आहेत. अ‍ॅल्युनियम खिडकी कायम ठेवली जाणार आहे. मात्र, प्लॅस्टरचा प्रकार वगळल्यास केवळ इमारतीच्या आतील बाजूच्या फिनिशिंगमध्ये थोडासा फरक पडणार आहे. प्लॅस्टरचा दर्जा बदलल्याने महापालिकेचा प्रतिचौरस फुटाचा दर घटून २ हजार ६४१ रुपये होणार आहे, तर प्रतिसदनिका दर ८ लाख ५३ हजार १४३ इतका असणार आहे. त्यातून या प्रकल्पाच्या खर्चात ११ कोटी ३० लाख ५५ हजार ५५ रुपयांची घट झाली असून, पालिकेची कोट्यवधीची बचत होणार आहे.
>चºहोली, रावेत प्रकल्पाचे काय?
महापालिका प्रशासन व ठेकेदाराने बोºहाडेवाडी प्रकल्पाचा फेरप्रस्ताव करताना खर्चात साडेअकरा कोटी रुपयांची घट केली आहे. मात्र, या आधी महापालिकेने मंजूर केलेल्या चºहोली आणि रावेत येथील आवास प्रकल्पांबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कारण, हाच नियम या प्रकल्पांना लावल्यास त्या प्रकल्पांमध्ये देखील महापालिकेच्या खर्चात बचत होऊ शकणार आहे. ही मागणी या फेरप्रस्तावावरून नव्याने होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
>स्थायी समितीच्या सूचनेनुसार ठेकेदार व अधिकाºयांनी चर्चा करून प्लॅस्टरमध्ये बदल केला. त्यामुळे सुमारे साडेअकरा कोटींचा फरक होणार असल्याचा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठविला आहे. स्थायीच्या मंजुरीनंतर राज्य व केंद्र सरकारकडेही हा प्रकल्प पाठविला जाईल. चºहोली प्रकल्पाच्या कामाचे आदेश झाले असून, रावेत प्रकल्पाचे आदेश अंतिम टप्प्यात आहेत. आता स्थायी समितीपुढे केवळ बोºहाडेवाडीच्या प्रस्तावाचा निर्णय आहे.
- श्रावण हर्डीकर, आयुक्त, पिं. चिं. महापालिका

Web Title: Bo-Hadevadi's refund proposal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.