मुलाच्या नावापुढे माझे नाव लाव म्हणून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न; पिंपरी चिंचवडमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 02:02 PM2022-07-25T14:02:50+5:302022-07-25T14:03:04+5:30

आरोपीला पोलिसांनी अटक केली...

Attempted murder of wife to put my name before child's name | मुलाच्या नावापुढे माझे नाव लाव म्हणून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न; पिंपरी चिंचवडमधील घटना

मुलाच्या नावापुढे माझे नाव लाव म्हणून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न; पिंपरी चिंचवडमधील घटना

Next

पिंपरी : पहिल्या मुलाच्या नावापुढे माझे नाव लावत नाही. मला नवऱ्यासारखी वागणूक देत नाही, असे म्हणत पतीने पत्नीचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार शनिवारी (दि. २३ ) पहाटे रहाटणी येथे घडला आहे.

याप्रकरणी पीडित ३९ वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रूपेश मच्छिंद्र साबळे (वय ३२ , रा. रहाटणी) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपी फिर्यादी यांचा दुसरा पती आहे. रूपेश याच्याशी लग्न झाल्यानंतर थोड्या दिवसांपासून, तू तुझ्या पहिल्या मुलाच्या नावापुढे माझे नाव लावत नाही. तू मला नवऱ्यासारखी वागणूक देत नाही, असे म्हणत फिर्यादीस वेळोवेळी शिवीगाळ व मारहाण केली. शनिवारी पहाटे फिर्यादी झोपल्या असताना आरोपीने त्यांना शिवीगाळ करून हाताने गळा आवळून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Attempted murder of wife to put my name before child's name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.