महाराष्ट्राची लाईफलाईन समजली जाणारी एसटी बस धावू लागली आणि वल्लभनगर आगार गजबजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 02:20 AM2017-10-22T02:20:46+5:302017-10-22T07:21:02+5:30

महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेला राज्यव्यापी बेमुदत संप शनिवारी पहाटे साडेचार वाजता मागे घेण्यात आला.

And the post of Vallabhnagar gajabajale | महाराष्ट्राची लाईफलाईन समजली जाणारी एसटी बस धावू लागली आणि वल्लभनगर आगार गजबजले

महाराष्ट्राची लाईफलाईन समजली जाणारी एसटी बस धावू लागली आणि वल्लभनगर आगार गजबजले

Next

नेहरुनगर : महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेला राज्यव्यापी बेमुदत संप शनिवारी पहाटे साडेचार वाजता मागे घेण्यात आला. महाराष्ट्राची लाईफलाईन समजली जाणारी एसटी बस धावू लागली अन् वल्लभनगर एसटी आगार प्रवाशांनी शनिवारी पुन्हा गजबजले. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय अखेर दूर झाली.
सातवा वेतन आयोगाप्रमाणे पद निहाय वेतन श्रेणी मिळावी, इतर शासकीय कर्मचाºयांप्रमाणे एसटी कर्मचाºयांना सुविधा मिळाव्यात, कनिष्ठ वेतन श्रेणी रद्द करावी, सन २००० पासून कनिष्ठ कामागारांना वेतनातील विसंगती दूर कराव्यात, १ एप्रिल २०१६ हंगामी वाढ सुरू करावी, जुल्मी परिपत्रके व चालक कम वाहकाची संकल्पना त्वरित रद्द करावी, करार कायदा परिपत्रके यांचा भंग करून होणाºया आकासपूर्वक बदल्या व कारवाया त्वरित थांबवावेत, सेवा निवृत्त कर्मचारी व त्यांच्या पत्नीस ५०० रु़ भरून मोफत पास द्यावा, आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेच्या वतीने बेमुदत संप पुकारण्यात आला होता.
यामुळे गेल्या तीन दिवस वल्लभनगर आगारातील महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत तालुके खेड्या -पाड्यात जाणाºया एकूण १३० एसटी बसेस बंद ठेवण्यात आल्या होत्या. ऐन दिवाळी एसटी बसेस बंद झाल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. अनेक नागरिकांना दुप्पट पैसे मोजून खासगी वाहनाचा उपयोग करावा लागला. यामुळे अनेक प्रवाशांना आर्थिक फटकादेखील बसला. एसटी कामगार संघटनेच्या वरिष्ठांचा आदेश आल्यानंतर शनिवारी पहाटे वल्लभनगर आगारातील सर्व चालक-वाहक आगारात रुजू झाले.
अनेक नागरिकांना एसटी आगार सुरू झाल्याची माहिती टीव्ही, प्रसार माध्यमातून मिळाल्यानंतर अनेक नागरिकांनी गावाकडे जाण्यासाठी वल्लभनगर आगारात गर्दी केली होती. ऐन भाऊबीजेच्या दिवशी गावाकडे जाण्यासाठी एसटी बस उपलब्ध झाल्याने अनेकांच्या चेहºयावर आंनद दिसून येत होता. आगारातून पहिली एसटी बस सकाळी ६ वाजता वल्लभनगर ते सांगली सोडण्यात आली. यानंतर नेहमीच्या वेळेनुसार अनेक बसेस महाराष्ट्रातील विविध मार्गांवर मार्गस्थ झाल्या. या वेळी अनेक बसेसमध्ये तुरकळ गर्दी असल्यामुळे काही एसटी बसेस आगारातून मोकळ्याच मार्गस्थ झाल्या.

>आगाराचे ५० लाखांचे नुकसान
नेहरुनगर : महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेच्या वतीने सातवा वेतन आयोग लागू करावा यासह विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी संप पुकारण्यात आला होता. या संपामुळे ऐन दिवाळीत चार दिवस वल्लभनगर आगारातील एसटी बस जागेवरच उभ्या असल्याने आगाराचे ५० लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती आगार व्यस्थापक अनिल भिसे यांनी दिली.
दिवाळी सुटीनिमित्त अनेक नागरिक शहरातून गावी जात असतात़ वल्लभनगर आगारामध्ये दिवाळीच्या काळात प्रवाशांची मोठी गर्दी असते. काही दिवसांपूर्वी आगाऊ नोंदणी करून आरक्षण देखील केले होते. आगारामधून जादा एसटी बसेस देखील सोडण्याचे नियोजन केले होते. परंतु संप पुकारण्यात आल्यामुळे ४ दिवस आगारातील १३० एसटी बसेस जागेवरच होत्या. यामुळे अनेकांनी दिवाळीनिमित्त केलेले आरक्षण रद्द केल्यामुळे त्यांचे पैसे परत द्यावे लागले.
एसटी कामगार संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बेमुदत संप शनिवारी पहाटे कामगार संघटनेच्या वरिष्ठ नेत्यांनी मागे घेतला. पहाटे साडेचार वाजता तातडीने सर्व चालक -वाहक आगारात रजू झाले. आगाराच्या नेहमीच्या वेळेनुसार सर्व एसटी बसेस महाराष्ट्रातील विविध मार्गांवर मार्गस्थ झाल्या. संप काळात लोकमतने चालक वाहकांच्या व्यथा मांडल्याबद्दल ‘लोकमत’चे आभार.
- प्रवीण मोहिते, अध्यक्ष,
वल्लभनगर एसटी कामगार संघटना
दिवाळी भाऊबीजनिमित्त सातारा या ठिकाणी दोन दिवसांपासून जायचे होते. मात्र, एसटीच्या संपामुळे गावाला जाता आले नव्हते. मात्र, एसटीचा संप मागे घेण्यात आल्यामुळे ऐन भाऊबीजेच्या दिवशी गावाकडे जाण्यासाठी एसटी बस सुरू झाल्यामुळे भाऊबीज साजरी करता येणार असल्यामुळे आंनद होत आहे.
- रुक्मिणी दुबळे, प्रवासी

Web Title: And the post of Vallabhnagar gajabajale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.