रहाटणीत १६ बांधकामावर पालिकेचा हातोडा; सलग २ दिवस सुरू राहणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 06:01 PM2018-02-01T18:01:30+5:302018-02-01T18:03:15+5:30

पालिकेच्या बांधकाम परवानगी अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग ग  प्रभाग यांच्या वतीने रहाटणी येथील सुमारे १७ हजार ००० चौरस फुटाचे १६ बांधकामे भुईसपाट केली.

action on illegal construction of the building in Rahatni; Action will continue for 2 consecutive days | रहाटणीत १६ बांधकामावर पालिकेचा हातोडा; सलग २ दिवस सुरू राहणार कारवाई

रहाटणीत १६ बांधकामावर पालिकेचा हातोडा; सलग २ दिवस सुरू राहणार कारवाई

Next
ठळक मुद्देपाडण्यात आल्या सुमारे १५ हजार चौरस फुटाच्या १५ व्यावसायिक पत्रा शेडकारवाईचे सत्र सुरू झाल्याने व कारवाईची टांगती तलवार डोक्यावर असल्याने नागरिक संकटात

रहाटणी : पालिकेच्या बांधकाम परवानगी अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग ग  प्रभाग यांच्या वतीने रहाटणी येथील गोडांबे कॉर्नर ते तापकीर मळा चौक या रस्त्यावरील नव्याने सुरु असलेल्या निळ्या पूररेषेतील व्यावसायिक पत्राशेड व एका आरसीसी बांधकामावर कारवाई करून सुमारे १७ हजार ००० चौरस फुटाचे १६ बांधकामे भुईसपाट केली. त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या परिसरात सलग दोन दिवस ही कारवाई सुरू राहणार असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले आहे.
मागील काही दिवसांपासून पालिकेची अनधिकृत बांधकामावरील कारवाई पुन्हा एकदा जोमात सुरु झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. एक गुंठा अर्धा गुंठ्यात ज्या नागरिकांचे बांधकाम आहे त्यांनाही पालिका प्रशासनाने नोटिसा दिल्या आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिक भीतीच्या सावटाखाली आहे. कारवाईचे सत्र सुरू झाल्याने व कारवाईची टांगती तलवार डोक्यावर असल्याने नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. 
गोडाबे कॉर्नर ते तापकीर मळा चौक या रस्त्यावरील सुमारे १५ हजार चौरस फुटाच्या १५ व्यावसायिक पत्रा शेड पाडण्यात आल्या तर २ हजार चौरस फुटाचे एक आरसीसी बांधकाम पाडण्यात आले.
या परिसरातील संबधित मिळकतधारकांना अतिक्रमण स्वत: हुन काढून घेण्यासाठी नोटीस बजावली होती. अनेकांनी मागील काही दिवसांपासून अतिक्रमणे काढून घेत होती. नोटिशीचा कालावधी संपताच पालिका प्रशासनाच्या संबधित विभागाने मोठ्या पोलीस बंदोबस्तात कारवाईला सुरुवात केली .यातील बरेच अनाधिकृत पत्राशेड ही निळी पुररेषेत आहेत. कारवाई काळात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून अनधिकृत पत्राशेडचे बांधकाम पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पोलिसा बरोबरच वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले होते. अचानक सुरु झालेल्या कारवाईमुळे नागरिक भयभीत झाले. 
ही कारवाई कार्यकारी मनोज शेठीया यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम परवानगीव् अनाधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग ग यांच्या पथकाने केली. 

Web Title: action on illegal construction of the building in Rahatni; Action will continue for 2 consecutive days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.