WWE मधील 'बूगीमॅन', जो लाईव्ह सामन्यात खायचा किडे! चक्रावून टाकेल सत्य; खऱ्या आयुष्यात दिसतो स्मार्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 09:54 AM2023-03-04T09:54:45+5:302023-03-04T09:58:02+5:30

WWE Superstar the boogeyman- WWE मध्ये असे अनेक सुपरस्टार आहेत की ज्यांच्या कॅरेक्टरने लहानपणी आपल्याला प्रभावीत केले असेल किंवा मनात भीती निर्माण केली असेल. अंडरटेकर, रॉक, स्टोन कोल्ड, ट्रिपल एच, केन हे तेव्हाचे गाजलेले खेळाडू

WWE मध्ये असाच एक कॅरेक्टर होता ... बूगीमॅन... हा खेळाडू लाईव्ह सामन्यात किडे खायचा... पाहताना ते खूपच किळसवाणे दिसायचे, परंतु त्याने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती आणि प्रतिस्पर्धीही त्याच्या या सवईने घाबरायचे

WWE मधील बुगीमॅन खरंच किडे खायचा की तो एक स्टंट असायचा? याबाबत जी माहिती समोर आलीय ती तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

WWE मधील बुगीमॅनचं खरं नाव मार्टिन राईट्स आहे... अमेरिकेच्या या कुस्तीपटूचा जन्म १५ जुलै १९६४ साली झाला होता. तो आता WWE च्या लीजेंट्स काँट्रॅक्टचा हिस्सा आहे...

मार्टिन राईटने पहिल्यांदा २००४ मध्ये WWE मध्ये सहभाग घेतला. सुरुवातीला तो एका लहान इव्हेंट्सचाच हिस्सा होता. पण, पहिल्याच मॅचमध्ये तो वादात अडकला...

मार्टीन राईट्सने त्याचं वय सांगण्यात गडबड केली होती. तो ४०व्या वर्षी त्याची पहिली फाईट खेळला, परंतु त्यानं त्याचं वय ३० वर्ष असल्याचे सांगितले होते.

बुगीमॅनला त्याचा लूक हा युनिक बनवायचा.. त्याचा लूक फारच घाबरवणारा होता आणि या दरम्यान तो सामन्यात किंवा रिंगमध्ये एन्ट्री घेताना किडे खायचा...

तर हो... आपल्या कॅरेक्टरला अधिक सक्षम बनवण्यासाठी तो किडे खायचा.. एका मुलाखतीत त्याने याबाबत सांगितले होते की,''मी बरेच किडे खाल्ले, परंतु WWEने मला केवळ Worm ( गांडुळ) पर्यंत मर्यादित राहण्यास सांगितले होते.''

WWE सोडल्यानंतर तो इंस्ट्रक्टर म्हणून काम करत राहिला आणि तो WWE च्या अनेक शोमध्ये व चित्रपटांतही झळकला.