Simone Johnson: The Rock आठवतोय का? त्याची मुलगी WWE मध्ये येतेय; मॉडेलिंगमध्ये कमावलेत करोडो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2021 02:51 PM2021-12-26T14:51:45+5:302021-12-26T14:56:02+5:30

Simone Johnson The Rock daughter: 90 च्या दशकात तर लहान मुलांमध्ये डब्ल्यूडब्ल्यूईची जबरदस्त क्रेझ होती. आजही आहे. यातीलच एक सुपरस्टार The Rock या नावाने ओळखला जाणारा Dwayne Johnson याने रिंगमध्ये खूप धमाल उडविली होती.

डब्ल्यूडब्ल्यूई बाबत अनेक कपोलकल्पित बोलले जाते. कोणी म्हणते ते खरे नसते, कोणी म्हणते ते स्क्रीप्टेड असते. काहीही असले तरी याच WWE चे भारतातही करोडोंमध्ये फॅन आहेत. 90 च्या दशकात तर लहान मुलांमध्ये डब्ल्यूडब्ल्यूईची जबरदस्त क्रेझ होती.

यातीलच एक सुपरस्टार The Rock या नावाने ओळखला जाणारा Dwayne Johnson याने रिंगमध्ये खूप धमाल उडविली होती. द रॉक इज कुकिंग म्हणत तो, प्रतिस्पर्ध्याला एका फाईटमध्येत रिंगच्या बाहेर फेकून देत होता. एका फाईटदरम्यान तो जखमी झाला आणि त्याला कायमचे रिंगबाहेर जावे लागले. आता या रॉकची मुलगी WWE मध्ये येतेय.

रॉकची पुढील पीढी रिंगमध्ये येण्यासाठी तयार झाली आहे. रॉकची मुलगी Simone Johnson ने WWE मध्ये पाऊल ठेवले आहे. तेव्हापासून सर्वत्र तिचीच चर्चा आहे. रॉक सध्या चित्रपट करत आहे. त्याने WWE ची रिंग सोडून हॉलवूडचे अॅक्शन पट गाजविण्यास सुरुवात केली आहे.

Simone Johnson ने गेल्या वर्षी WWE, NXT चे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. तेव्हा रॉकदेखील एकदा तिच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये गेला होता. लवकरच सिमोनचे नाव मेन रोस्टरमध्ये येणार आहे.

सिमोन WWEमध्ये येण्याआधीच तिचे फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे. कारण ती मॉडेलिंग करत होती. शिवाय ती इन्स्टावर देखील खूप फोटो टाकत असते.

Essentially Sports नुसार सिमोन जॉन्सनची संपत्ती 2021 पर्यंत 50 दशलक्ष डॉलर्स एवढी आहे. तर रॉकची संपत्ती 110 दशलक्ष डॉलर्स एवढी आहे. मॉडेलिंगमधून सिमोनने करोडोंची कमाई केलेली आहे.

सिमोन जॉन्सनने WWE च्या सध्याच्या स्टार्सना देखील संपत्तीच्या बाबतीत मागे काढले आहे. रिंगमध्ये येण्याआधीच Simone Johnson फॅन फॉलोईंग आणि कमाईच्याबाबतीत मागे सोडले आहे.

Simone Johnson चे इन्स्टाग्रामवर 4.4 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तर ट्विटवरवर फॉलोअर्सची संख्या हजारांमध्ये आहे.