जगभरातील प्रसिद्ध रूफटॉप रेस्टॉरंट्सना एकदा तरी भेट द्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 05:46 PM2018-12-27T17:46:43+5:302018-12-27T17:53:49+5:30

खाण्यापिण्याचे शौकीन असलेल्या व्यक्ती नवनवीन खाण्याचे पदार्थ आणि जागा शोधत असतात. तेच जर गोष्ट ट्रव्हलिंगची असेल तर अशा व्यक्ती खाण्यासोबतच रेस्टॉरंट निवडतानाही अनेक बाबी लक्षात घेतात. पण जर तुम्हीही अशा व्यक्तींमध्ये मोडत असाल तर जगातील सर्वात उंच लोकेशन्सवर जेवण करणं तुम्हाला आवडेल का? जाणून घेऊया जगातील सर्वात सुंदर रूफटॉप रेस्टॉरंट्सबाबत...

एलवीएमएच (LVMH Building)च्या दुसऱ्या मजल्यावर स्थित अल्ट्रा ट्रेन्डी स्पॉटवर जाऊन खाण्याची मजा काही औरच. या रेस्टॉरंटमध्ये अनेक नवीन आणि हटके पदार्थ टेस्ट करू शकता. एवढेच नाही तर या रेस्टॉरंटमधून तुम्ही संपूर्ण शहराचं दृश्य पाहू शकता.

थंडीमध्ये जर तुम्ही लिस्बन सिटीमध्ये फिरण्यासाठी जाण्याचा प्लॅन केला असेल तर तुम्ही येथील टोपो रेस्टॉरंटमध्ये जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. येथील सर्वात खास गोष्ट म्हणजे, थंडीमध्ये येथील वुडन इंटीरियर उष्ण वातावरण तयार करण्याचं काम करतं. या रेस्टॉरंटच्या फ्लोअरपासून सिलिंगपर्यंत सर्वकाही पोर्तुगाली शैलीमध्ये तयार करण्यात आलं आहे.

न्यूयॉर्कमध्ये फिरण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्या ट्रॅव्हल लिस्टमध्ये द टॉप ऑफ द स्टँडर्ड रेस्टॉरंटचा समावेश करू शकता. टॉप ऑफ स्टॅडर्ड एक असं रेस्टॉरंट आहे, जिथून तुम्हाला संपूर्ण मॅनहॅटन शहराचं सुंदर दृश्य न्याहाळता येऊ शकतं.

बीजिंगमधील या लग्जरी रूफटॉप रेस्टॉरंटमधून तुम्ही बीजिंग मार्केट आरामात पाहू शकता. यूरोपियन स्टाइलमध्ये तयार करण्यात आलेल्या या रेस्टॉरंटमध्ये जेवण तयार करण्यासाठी हाय क्वालिटी मसाले वापरण्यात येतात. येथील सूप फार प्रसिद्ध आहे.

ज्यूरिखमधील क्लाउड रेस्टॉरंटमध्ये ओपन किचन तयार करण्यात आलं आहे. ज्यामध्ये तुम्ही स्वतः जेवण तयार करताना पाहू शकता. प्राइम टॉवरवर असलेल्या या रेस्टॉरंटमध्ये जाऊन तुम्ही सुंदर दृश्यांचा आस्वाद घेऊ शकता.

बँकॉकमधील एका बनियान ट्रीमध्ये स्थित असलेल्या या रेस्टॉरंटमध्ये जेवताना तुम्ही आकाशात बसून जेवत असल्याचा अनुभव घेऊ शकता. हे रेस्टॉरंट 61व्या फ्लोअरवर असून येथे तुम्ही हटके पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता.