निसर्गाच्या सान्निध्यातलं पारदर्शक 'Bubble Hotel'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2019 03:55 PM2019-01-05T15:55:16+5:302019-01-05T16:19:19+5:30

वाढते प्रदूषण ही सर्वच देशांची समस्या आहे. मात्र यापासून सुटका मिळवण्यासाठी आणि लोकांना निसर्गाच्या अधिक जवळ आणण्यासाठी चीनने एक भन्नाट आयडिया शोधून काढली आहे.

दक्षिण चीनमधील गुइलिनमध्ये एक बबल हॉटेल उभारण्यात आले आहे. बबल हॉटेल सुंदर असून दोन डोंगरांमध्ये असलेल्या नदीजवळ तयार करण्यात आले आहे. जगभरातील अनेक पर्यटक या हॉटेलला आवर्जून भेट देत असतात.

लोकांना निसर्गाच्या सानिध्यात राहता या मुख्य उद्देशाने हे हॉटेल तयार करण्यात आले आहे. हे हॉटेल पूर्णपणे पारदर्शी असून बबलच्या खोल्या तयार करण्यात आल्या आहेत.

बबल हॉटेल दोन मजल्यांचे आहे. एखाद्या डबल डेकर विलाप्रमाणे हे हॉटेल तयार करण्यात आले आहे. तसेच हॉटेलमध्ये येणाऱ्या पर्यटकांना सर्व सुविधा देण्यात आलेल्या आहेत.

गुइलिन हे चीनमधील सर्वात सुंदर शहरांपैकी एक आहे. या शहरातील मुख्य व्यवसाय पर्यटन आहे. गेल्या वर्षी जानेवारीपासून सप्टेंबरपर्यंतच्या नऊ महिन्यांमध्ये आठ कोटी पर्यटकांनी या ठिकाणाला भेट दिली आहे.

गुइलिन शहरात राहणाऱ्या लोकांची 20 टक्के कमाई ही फक्त पर्यटनामुळे होते. त्यामुळेच चीनमधील ईको टूरिज्म डेस्टिनेशन म्हणून या शहराचा विकास करण्यात येत आहे.

2020 पर्यंत शहराच्या कमाईतील 27 टक्के हिस्सा हा पर्यटनातून येईल असा येथील लोकांना असा विश्वास आहे. याआधी चीनव्यतिरिक्त फ्रान्समध्येही बबल हॉटेल तयार करण्यात आलं होतं.