जगभरातील 'ही' ठिकाणं आहेत नाइट लाइफसाठी प्रसिद्ध!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 03:56 PM2018-10-25T15:56:59+5:302018-10-25T16:01:25+5:30

जगभरामध्ये अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे आयुष्यात एकदा तरी भेट देणं गरजेचं आहे. यातील अनेक शहरं अशी आहेत ज्याठिकाणी फिरण्याची मजा फक्त रात्रीच येते. या शहरांमधील नाइटलाइफ अनुभवण्यासाठी येथे देशो-विदेशीचे अनेक पर्यटक येतात. जाणून घेऊयात जगभरातील अशा शहरांबाबत ज्या शहरांचं खरं सौंदर्य रात्री अनुभवता येतं.

रोमॅन्टिक डेस्टिनेशन म्हणून सर्वजण पॅरिसला ओळखतात. या शहराचं सौंदर्य फक्त दिवसाच नाही तर रात्रीही खुलून दिसतं. अनेक जण या शहरामध्ये रात्री रस्त्यावरून फिरताना तुम्हाला दिसतील.

एम्सटर्डम एक सुंदर शहर आहे. या शहरात फिरण्याची खरी मजा ही रात्री येते. येथे अनेक नाइट कॅफे, डिस्को, रेस्टॉरंट्स आहेत. तरूणांना हे शहर फार आकर्षित करते.

बॅन्कॉकच्या नाइट मार्केटमध्ये शॉपिंग करणं हे फार सुखावणारं आहे. शॉपिंगव्यतिरिक्त तुम्ही येथे चविष्ट अशा स्ट्रिट फूडचा आनंद घेऊ शकता. बॅन्कॉक येथील मार्केट्ससाठी प्रसिद्ध आहे.

टोकियोमध्ये रात्री फिरण्याची मजा काही औरच. स्वादिष्ट जेवण, कॅरियोके बार, नाइट क्लब्स यांसारख्या गोष्टींमुळे तरूणाई या शहरात फिरण्यासाठी फार उत्सुक असते.

टॅग्स :पर्यटनtourism