जगभरातील 'ही' ८ ठिकाणे वातावरणानुसार बदलतात रंग, प्रत्येक रंग असतो मनमोहक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 02:39 PM2019-07-04T14:39:43+5:302019-07-04T14:46:21+5:30

जर तुम्हाला फिरायचे शौकीन असाल तर तुम्हाला फिरायला जाण्यासाठी अनेक ठिकाणे मिळतील. पण कोणत्या वातावरणात कुठे फिरायला जायचं हे ठरवणं कुणासाठीही अडचणीचं ठरतं. तसंही प्रत्येक वातावरणाचं आपलं एक वेगळं महत्त्व असतं. कुणाला उन्हाळ्यात, कुणाला पावसाळ्यात तर कुणाला हिवाळ्यात फिरायला जायला आवडतं. जसं वातावरण बदलतं तसं त्या त्या ठिकाणांचं सौंदर्य देखील बदलतं. अशाच काही ठिकाणांचे वेगवेगळ्या वातावरणातील फोटो आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. (Image Credit : www.boredpanda.com)

१) Bethesda Terrace (New York, USA) - न्यूयॉर्कमध्ये पर्यटकांसाठी आकर्षण ठरणाऱ्या अनेक इमारती आहेत. यातीलच एक आहे सेंट्रल पार्कच्या मधोमध Bethesda Terrace ही इमारत आहे. ही इमारत न्यूयॉर्कची शान मानली जाते.

२) Shaman Rock (Olkhon Island, Russia) - मध्य पूर्व रशियाच्या इरकुत्स्क प्रांतात असलेलं ओलखोन द्वीप हे बुरयत लोकांसाठी एक पवित्र स्थान आहे. हे ठिकाण Shamanic Energy च्या पाच प्रमुख वैश्विक स्त्रोतांपैकी एक आहे. दरवर्षी इथे लाखो भाविक येतात. शमांका किंवा शेमन रॉक येथील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक आहे. या द्वीपावर १५०० लोक राहतात.

३) Elqui Valley Vineyards (Chile) - चिलीतील एल्की व्हॅली जगभरातील पर्यटकांसाठी नवीन नाही. या सुंदर व्हॅलीला बघण्यासाठी सर्वात चांगला कालावधी फेब्रुवारी आणि मे दरम्यान असतो. जून आणि जुलैमध्ये इथे पाऊस असतो आणि थंडी सुद्धा.

४) The Chapel At King’s College, University Of Aberdeen (Scotland, UK) - हे कॉलेज स्कॉटलॅंडची शान आहेत. पूर्व स्कॉटलॅंडचं हे क्षेत्र वातावरणाच्या हिशेबाने ब्रिटनमधील सर्वात चांगला परिसर मानला जातो. हे शहर ब्रिटनमधील सर्वात सुंदर शहरांपैकी एक आहे. उन्हाळ्यात इथे रात्री पूर्णपणे अंधार होत नाही, त्यामुळे येतील रात्री सुंदर असतात.

५) Nymphenburg Palace (Munich, Germany) - हा आलिशान महाल १६६४ ईसवीमध्ये Wittelsbach Dynasty साठी उन्हाळ्यात राहण्यासाठी तयार करण्यात आला होता. उन्हाळ्यात इथे पर्यटकांनी मोठी गर्दी बघायला मिळते.

६) Roman Amphitheatre (Plovdiv, Bulgaria) - बुल्गेरियाच्या सुंदर Plovdiv शहरातील रोमन Amphitheatre ने यूरोपच्या प्रत्येक बदलत्या ऋतुला अनुभवलं आहे. थ्रेसियन मैदानातील सहा डोंगरांच्या मधे असलेलं वर्षभर बघता येऊ शकतं. तसेच हिवाळ्या तुम्ही इथे बर्फाचाही आनंद घेऊ शकता.

७) Mount Warning National Park (New South Wales, Australia) - ऑस्ट्रेलियाच्या न्यू साउथ वेल्समध्ये असलेल्या बुंजालुंग हे ठिकाण आदिवासी लोकांसाठी सांस्कृतिक महत्त्वासाठी जाणलं जातं. या सुंदर परिसरात माउंट वॉर्निंगचं ज्वालामुखी सुद्धा बघता येतो. इथे नेहमीच वातावरण चांगलं असतं.

८) Stone Chariot At The Vittala Temple (Karnataka, India) - हम्पी हे कर्नाटकातील बेल्लारी जिल्ह्यात आहे. अनेक सुंदर आणि ऐतिहासिक गोष्टींमुळे हे ठिकाण जगभरात प्रसिद्ध आहे.