Corona killer: कोरोनाचा कर्दनकाळ! हवेतल्या हवेतच कोरोना, फंगसला मारणार; IIT ने एअर प्युरिफायर बनवला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 04:40 PM2021-05-24T16:40:37+5:302021-05-24T16:47:56+5:30

Corona killer worlds first antimicrobial air purifier: अनेक संशोधकांच्या दाव्यानुसार कोरोना व्हायरस आणि ब्लॅक फंगस हा हवेतून नाका आणि तोंडात पोहोचू शकतो. या दाव्यांमध्ये आयआयटी मुंबईकडून एक दिलासादायक बातमी येत आहे. आयआयटी कानपूर आणि त्यांनी मिळून पहिला अँटिमायक्रोबायल एअर प्युरिफायर तयार केला आहे

देशात कोरोना व्हायरसची दुसरी लाट काहीशी सुस्त पडू लागली आहे. परंतू ब्लॅक फंगसने डोके वर काढले आहे. याचसोबत तिसऱ्या लाटेची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

अनेक संशोधकांच्या दाव्यानुसार कोरोना व्हायरस आणि ब्लॅक फंगस हा हवेतून नाका आणि तोंडात पोहोचू शकतो. या दाव्यांमध्ये आयआयटी मुंबईकडून एक दिलासादायक बातमी येत आहे. आयआयटी कानपूर आणि त्यांनी मिळून पहिला अँटिमायक्रोबायल एअर प्युरिफायर तयार केला आहे. (IIT Kanpur and IIT Bombay collectively designed the primary antimicrobial air purifier. )

हा एअर प्युरिफायर तयार करणारी संस्था इनक्यूबेटर एअर्थ च्या दाव्यानुसार हा प्युरिफायर कोणत्याही प्रकारचे जंतू, व्हायरस, फंगस, बॅक्टेरियाला डिअॅक्टिव्हेट करण्यास सक्षम आहे.

अँटीमाय़क्रोबायल एअर प्युरिफायरला आयआयटीच्या वैज्ञानिकांच्या देखरेखीखाली तयार करण्यात आले आहे. हा प्युरिफायर 600 स्क्वेअर फूटातील हवा व्हायरस आणि बॅक्टेरिया फ्री करतो. म्हणजेच एखाद्या १ बीएचके फ्लॅटएवढी. (This air purifier retains the air of 600 sq. ft virus-free and bacteria-free.)

एअर्थ कंपनीचे सीईओ रवी कौशिक यांच्यानुसार, हॉस्पिटलमध्ये ही मोठी समस्या असते. रुग्णांच्या आजुबाजुच्या हवेमध्ये व्हायरस मोठ्या प्रमाणावर असतो, तो बाहेर कसा काढायचा हा प्रश्न असतो. यामुळे त्यांच्याकडे हवेतील व्हायरस मारण्याचे दोन पर्याय असतात. पहिला युव्ही लाईटचा वापर करून आणि दुसरा केमिकल स्प्रे करून. या दोन्ही पर्यायांचा वापर जेव्हा तिथे पेशंट नसेल तेव्हाच वापर केला जाऊ शकतो. कारण हे दोन्ही पर्याय मनुष्यासाठी हाणीकारक असतात.

पहिला युव्ही लाईटचा वापर करून आणि दुसरा केमिकल स्प्रे करून. या दोन्ही पर्यायांचा वापर जेव्हा तिथे पेशंट नसेल तेव्हाच वापर केला जाऊ शकतो. कारण हे दोन्ही पर्याय मनुष्यासाठी हाणीकारक असतात.

कौशिक यांनी सांगितले की, हे लक्षात घेवून दोन्ही आयआयटीनी एक नवीन यंत्र विकसित केले आहे. याला अँटीमायक्रोबिअल एअर प्युरिफायर म्हणतात. हा तीन गोष्टींवर आधारित आहे. फंगस, बॅक्टेरिया आणि व्हायरसला रिअल टाईम डिअॅक्टिव्हेट करू शकतो.

दुसरी बाब म्हणजे लोक संपूर्ण वेळ हा प्युरिफाय़र त्यांच्या आजुबाजुला वापरू शकतात. तिसरी बाब म्हणजे हा संपूर्णपणे सुरक्षित आहे. याचा शरिरावर कोणताही साईड इफेक्ट होत नाही.

जेव्हा जिवंत विषाणू या एअर प्युरिफायरमध्ये येतात तेव्हा त्यांचे डिअॅक्टिव्हेशन सुरु होते.

या विषाणुंना खास फिल्टरद्वारे पकडतो. या सिस्टिममध्ये पुन्हा हे व्हायरस डिअॅक्टिव्हेट केले जातात.

या अँटीमायक्रोबायल एअर प्युरिफायरची टेस्टिंग दोन वेगवेगळ्या लॅबमध्ये करण्यात आली आहे. यामध्ये हा प्युरिफायर कोरोना व्हायरस आणि फंगससारख्या छोटे कणदेखील डिअॅक्टिव्हेट करू शकतो. यामुळे आजुबाजुची हवा 99 टक्के शुद्ध राहते.