31 डिसेंबरपर्यंत 'या' फोनवर व्हॉट्सअ‍ॅप बंद होणार; तुमचा तर नाहीय ना?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 12:57 PM2019-05-08T12:57:39+5:302019-05-08T13:03:46+5:30

WhatsApp हे जगभरात मॅसेंजिंगसाठी वापरण्यात येणारे लोकप्रिय अ‍ॅप आहे. या अ‍ॅपची सवयच एवढी लागली आहे की मॅसेज आला नाही तरीही 2-4 दा हे अ‍ॅप उघडून पाहिले जातेच जाते. जर हे अ‍ॅपच तुमच्या मोबाईलमधून येत्या 31 डिसेंबरपासून बंद झाले तर... हो, व्हॉट्स अ‍ॅप बंद होणार आहे. पण काही मोबाईलवरूनच ते बंद होणार आहे. यामध्ये अ‍ॅपलच्या आयफोनचाही समावेश आहे. कदाचित तुमचाही मोबाईल यामध्ये असू शकतो.

एका टेक्नॉलॉजिशी संबंधीत ब्लॉगवर याची सूचना देण्याता आली आहे. अँड्रॉईडमुळे विंडोज मोबाईलना काळे दिवस आले. यामुळे तेव्हाची जगज्जेती कंपनी नोकिया पार रसातळाला गेली. शेवटी ही कंपनी मायक्रोसॉफ्टने विकत घेतली. परंतू अपयशच आले. बऱ्याचजणांकडे आजही हे फोन आहेत. मात्र, व्हॉट्सअ‍ॅप या फोनवरील अ‍ॅप बंद करणार आहे.

यामुळे येत्या 31 डिसेंबरनंतर हे अ‍ॅप या फोनवर चालणार नाही. याआधी 2016 पर्यंतच्या विंडोज फोनमधून व्हॉट्सअ‍ॅप काढून टाकण्यात आले होते.

याशिवाय आयफोनच्या आयओएसचाही नंबर आला आहे. व्हॉट्सअ‍ॅप iOS 7 किंवा त्यापेक्षा जुन्या ओएसवर चालणार नाही. या फोनवरही व्हॉट्सअ‍ॅप बंद केले जाणार आहे. या प्लॅटफॉर्मवरील फोनसाठी कंपनीने काहीच विकसित केलेले नाही. यामुळे या अ‍ॅपवरील काही फिचर्स काम करणे बंद होणार आहे.

अँड्रॉईडही यातून सुटलेले नाही. 1 फेब्रुवारी 2020 पासून अँड्रॉईड 2.3.7 व्हर्जन किंवा त्याआधीची ओएसवर व्हॉट्सअ‍ॅप बंद केले जाणार आहे.

विंडोज 10 पीसीवरून WhatsApp सपोर्ट सुरुच ठेवला जाणार आहे. यासाठी WhatsApp UWP असे एक वेगळे अ‍ॅप डेव्हलप करण्याच्या तयारीत व्हॉट्स अ‍ॅप आहे. या आधी व्हॉट्सअ‍ॅपने ब्लॅकबेरी, नोकिया एस40, नोकिया सिंबियन एस60 ला सपोर्ट देणे बंद केले आहे.