मोठी ऑफर! iPhone 12 वर 18 हजार रुपयांपर्यंत सूट,जाणून घ्या कुठे मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 05:10 PM2022-11-21T17:10:30+5:302022-11-21T17:15:03+5:30

तुम्ही आयफोन गेण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. iPhone 12 खरेदी करण्याची उत्तम संधी आहे.

तुम्ही आयफोन गेण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. iPhone 12 खरेदी करण्याची उत्तम संधी आहे.

एका अहवालानुसार, 64 GB iPhone 12 ची किंमत सध्या 7,130 रुपयांच्या सूटनंतर 48,999 रुपये आहे. हा फोन ऑक्टोबर 2020 मध्ये लाँच झाला होता.

लॉन्चच्या वेळी या फोनची किंमत 79,990 रुपये होती. नवीन मॉडेल्स लाँच झाल्यामुळे त्याची किंमत कमी होत आहे. अहवालानुसार, 15 नोव्हेंबरला या फोनची किंमत 56,129 रुपये होती, जी आता 48,999 रुपये झाली आहे. या किंमतीसह तुम्ही फ्लिपकार्टवरून iPhone 12 खरेदी करू शकता.

तुमच्याकडे फेडरल बँकेचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड असल्यास, तुम्हाला आणखी 1,500 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. तुम्ही बँग एक्सचेंज ऑफरमध्ये iPhone 12 64GB देखील खरेदी करू शकता. कंपनी फोनवर 17,500 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट देत आहे.

कंपनीने या फोनमध्ये सुपर रेटिना XDR डिस्प्ले आणि सिरॅमिक शील्ड ग्लाससह 6.1-इंचाचा OLED डिस्प्ले दिला आहे. फोन 64 GB, 128 GB आणि 256 GB अशा तीन प्रकारांमध्ये येतो.

या फोनमध्ये A14 बायोनिक चिपसेट दिला आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

यामध्ये 12 मेगापिक्सलचे दोन कॅमेरे आहेत. सेल्फीसाठी देखील कंपनी या फोनमध्ये फक्त 12 मेगापिक्सेल कॅमेरा देत आहे. फोनमध्ये दिलेले IP68 रेटिंग धूळ आणि पाणी प्रतिरोधक आहे. iPhone 12 मध्ये दिलेली बॅटरी एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 17 तास चालते.