अलर्ट! Facebook लॉगिन करेल 'कंगाल', एका झटक्यात रिकामं होईल बँक अकाऊंट; 'असा' करा बचाव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 02:46 PM2022-06-26T14:46:55+5:302022-06-26T15:06:34+5:30

Facebook News : फेसबुक युजर्सला लक्ष्य करण्यासाठी हॅकर्सनी विशेष पद्धत तयार केल्याची माहिती मिळत आहे. जगभरातील 50 लाखांपेक्षा जास्त युजर्सना टार्गेट करण्यात आले आहे.

फेसबुक हे एक लोकप्रिय माध्यम असून त्याचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. फोटो, व्हिडीओ शेअर करण्यासाठी, मित्र, मैत्रिणी, नातेवाईक यांच्याशी संपर्क साधण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी हे प्रभावी माध्यम आहे. पण आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जगभरातील लाखो फेसबुक अकाऊंट्स सध्या धोक्यात आहेत. फेसबुक युजर्सला लक्ष्य करण्यासाठी हॅकर्सनी विशेष पद्धत तयार केल्याची माहिती मिळत आहे. जगभरातील 50 लाखांपेक्षा जास्त युजर्सना टार्गेट करण्यात आले आहे.

विशेषत: मोबाईलमधून फेसबुक मेसेंजर वापरणाऱ्यांना यामध्ये टार्गेट करण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या फिशिंग अटॅकची माहिती जरी आता मिळाली असली तरी गेल्या वर्षभरापासून त्याचा वापर हा केला जात आहे.

अँटी फिशिंग ब्राऊझर एक्सटेन्शन PIXM च्या निक एस्कोली यांनी या हल्ल्याचा खुलासा केला आहे. अनेक वेबसाईट या फेसबुक लॉगिन पेजसारख्या आहेत. त्यामध्ये युजर्स फेसबुक समजून आपली सर्व माहिती भरतात, असे त्यांच्या संशोधन टीमला आढळले आहे.

या वेबसाईटच्या लिंकचा मेसेंजरच्या माध्यमातून वेगाने प्रसार होत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. या माध्यमातून हॅकर्स मोठी कमाई करत असल्याचं या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आलंय.

एखाद्या युजरने त्याची फेसबुकची माहिती नकली वेबसाईटवर भरली तर त्याला एका जाहिरातीच्या पेजशी जोडले जाते. त्यानंतर हॅकर्स या नकली लॉगिन पेजवरील एका युजरच्या माध्यमातून महिना शेकडो डॉलर्स कमवू शकतात.

कोणत्याही संशयास्पद ऑनलाईन मेसेजवरील लिंकवर अथवा अटॅचमेंटवर क्लिक करू नका. एखादा मेसेज किंवा वेबसाईट तुम्हाला विश्वासर्ह वाटली नाही तर कृपया वेळीच सावध व्हा. त्यावरील सुचनांप्रमाणे व्यवहार करणे टाळा

कोणत्याही अनोळखी वेबसाईटवर फेसबुक लॉगिन करू नका. तुम्हाला या पद्धतीचा नकली वेबसाईट आढळली तर तातडीनं त्याची माहिती सायबर क्राईम सेलला द्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.