Apple कडून मोठी चूक! लाँच पूर्वीच समोर आला iPhone 14 चा फोटो; डिजाइन पाहून आनंदले चाहते

By सिद्धेश जाधव | Published: May 31, 2022 10:15 AM2022-05-31T10:15:07+5:302022-05-31T10:22:53+5:30

Apple ने Apple Pay च्या एका जाहिरातीमधून आगामी iPhone 14 च्या डिजाइनचा खुलासा झाला आहे. हा व्हिडीओ ऑनलाईन वायरल झाला आहे. कंपनीनं मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

Apple Archive Thai या युट्युब चॅनलवर एक जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिरातीत एक वेगळा आयफोन मॉडेल दिसत आहे, जो आयफोन 14 असू शकतो असा अंदाज लावला जात आहे.

Apple नं मात्र आगामी आयफोन बाबत कोणतीह माहिती दिलेली नाही. iPhone 14 ची अधिकृत झलक पाहण्यासाठी स्प्रिंग इव्हेंटची वाट बघावी लागेल.

आगामी आयफोन 14 सीरिजमध्ये आयफोन 14, आयफोन 14 मॅक्स, आयफोन 14 प्रो आणि आयफोन 14 प्रो मॅक्स असे मॉडेल सादर केले जाऊ शकतात. यावेळी आयफोन 14 मिनी मात्र सादर केला जाणार नाही, अशी माहिती मीडिया रिपोर्ट्समधून मिळाली आहे.

ही जाहिरात खरी असल्यास iPhone 14 लाईनअप मधील सर्व मॉडेलमध्ये नवीन नॉच दिसेल, जी iPhone 13 पेक्षा वेगळी असेल. यात एक पिल शेप आणि होल पंच स्किनच्या वरच्या बाजूला, मध्यभागी देण्यात येईल.

Apple ची iPhone 14 सीरीज ठरल्या वेळेनुसार लाँच केली जाऊ शकते. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार चीनमधील लॉकडाउनमुळे शेड्युलवर परिणाम होऊ शकतो.

आगामी iPhone मध्ये सॅटेलाईट कनेक्टिव्हिटी फीचर असण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुर्गम भागातून देखील नेटवर्कशिवाय आयफोन वापरून कॉल्स करता येतील.

टॅग्स :अॅपलApple Inc