Viral Girls on social media in 2022: कुणाचा डान्स तर कुणाची स्टाईल... 'या' Viral सौंदर्यवतींनी गाजवलं 2022चं वर्ष!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 06:52 PM2022-12-08T18:52:35+5:302022-12-08T19:24:05+5:30

यंदाच्या वर्षी अनेक सौंदर्यवती सोशल मीडियावर रातोरात सेलिब्रिटी झाल्या अन् सुपरस्टार बनल्या.

Viral Girls on social media in 2022: सध्या सुरू असलेले २०२२ हे साल आता संपत आले आहे. या वर्षातील अवघे काहीच दिवस उरले आहेत. या वर्षी अशा अनेक सौंदर्यवती सोशल मीडियावर रातोरात सेलिब्रिटी झाल्या अन् सुपरस्टार बनल्या. अनेक मुलींनी ज्या पद्धतीने अल्पावधीत करोडो लोकांना वेड लावले, त्याची वर्षाच्या शेवटच्या दिवसांत आठवणींच्या रूपाने पुन्हा एकदा चर्चा होत आहे.

यातील काही मुलींनी आपल्या सौंदर्याने, काहींनी नृत्याने तर काहींनी आपल्या स्टाईलने लोकांना घायाळ केले. त्यांनी प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले. या मुलींची क्रेझ सोशल मिडियावर केवळ देशातच नाही तर जगभरात दिसून आली. पाहूया व्हायरल झालेल्या काही निवडक सौंदर्यवती...

या वर्षी भुवन बाद्याकरचे 'कच्चा बदम' गाणे हिट झाले. पण त्यापेक्षा हिट झाला तो अंजली अरोराचा (Anjali Arora) कच्चा बदामवाला ग्लॅमरस आणि बोल्ड डान्स. तिच्या त्या एका डान्स पोस्टला कोट्यवधी व्ह्यूज मिळाले. त्यानंतर तिला एका रिअॅलिटी शोमध्ये आणि जाहिरातींमध्येही संधी मिळाली.

नुकताच T20 World Cup झाला. त्यात पाकिस्तान-न्यूझीलंड सामन्यात एका मिस्ट्री गर्लने सौंदर्यामुळे वाहवा मिळवली आणि चाहत्यांची मने जिंकली. या मुलीचे नाव नताशा (Natasha Pakistani Fan Girl) असून तिचे स्टेडियममधील फोटो व्हायरल झाले होते. ती मुलगी पाकिस्तानी संघाला चिअर करताना दिसली. नंतर ती कॅमेराकडे पाहून फ्लाइंग किसही देताना पाहायला मिळाली.

इशानी (Eshani) एक डान्सर आणि डेंटिस्ट आहे. जूनमध्ये, तिने इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यात ती अमेरिकेच्या टाइम्स स्क्वेअरवर बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या 'बरसो रे मेघा' या गाण्यावर नाचताना दिसली. तो व्हिडिओ खूप गाजला. त्याला २५ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

सध्या सोशल मीडियावर आणखी एका मुलीचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. लतादीदींच्या 'मेरा दिल ये पुकारे आ जा' या गाण्यावर नाचणारी ही मुलगी आहे आएशा (Ayesha) आहे. हिच्या डान्सला खूप लाइक्स आणि शेअर मिळाले. तिचा या गाण्यावरील डान्स इतका व्हायरल होत आहे की लोक वेगवेगळ्या अकाऊंटवरून लाखोंच्या संख्येने डान्स स्टेप्स रिक्रिएट करत आहे.

जगभरात हिजाबचा मुद्दा गाजला. इराण मध्ये हिंसक दडपशाहीनंतर जगभरात महिला निदर्शने करत होती. यात पाकिस्तानची महिला डीजे नेहा खानने (DJ Neha Khan) तिला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याची व्यथा शेअर केली होती. पण तरीही तिने सर्व गोष्टींना नेटाने तोंड दिल्याने तिची चांगलीच चर्चा रंगली होती.

'पावरी गर्ल'चे नाव तुम्ही ऐकलेच असेल. तिची अचानक सोशल मिडियावर चर्चा सुरू झाली. तिचे खरे नाव दाननीर मोबीन (Dananeer Mobeen) असून ती पाकिस्तानातील पेशावर येथील आहे. २० वर्षांची दाननीर 'हमारी पावरी हो रही है' या एका व्हिडिओमुळे चर्चेत आली होती आहे.

श्रीलंकन ​​गायिका योहानीचे 'मानिक मागे हिते' गाणे सुपरहिट झाले. या गाण्यावर आयत नावाच्या एअर होस्टेसने डान्स करतानाचा व्हिडिओ शेअर केला. लोकांना हा व्हिडीओ एवढा आवडला की हा व्हिडीओ रातोरात व्हायरल झाला. आज, आयत एअर होस्टेस सोबत एक मोठी सेलिब्रिटी आणि सोशल मीडियावर खूप अँक्टिव्ह आहे.