Social Viral: 'या' समुद्र किनाऱ्यावर कपडे घालणाऱ्यांकडून आकारला जातो लाखो रुपयांचा दंड!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2022 03:33 PM2022-08-06T15:33:33+5:302022-08-06T15:41:04+5:30

Cap D'Agde beach: हनिमून अर्थात मधुचंद्र म्हटल्यावर वेशभूषा स्वातंत्र्याचा लोक पुरेपूर अनुभव घेतात. फोटो काढतात, सोशल मीडियावर टाकतात आणि भरपूर लाईक, कमेंट मिळवतात. परंतु, फ्रान्स मध्ये एक शहर आहे. त्याचं नाव कॅप डी'एग्डे आहे. येथे लोकांना कपडे घालण्याची परवानगी नाही. असे कोणी केल्यास त्याच्यावर दंड आकारला जातो. पण असे का? कारण....

या शहरातल्या लोकांना कपडे घातल्याने आत्मविश्वास कमी होतो असे वाटते. म्हणून आदिमानवाचा आदर्श ठेवत ते विवस्त्र राहणे पसंत करतात. याउलट जे लोक कपडे घालतात त्यांच्याकडून पैसे आकारले जातात. असा कपडे मुक्तीचा आनंद घेण्यासाठी अनेक हौशी मंडळी आपल्या मधुचंद्रासाठी या शहराची निवड करतात म्हणे!

या शहरातल्या लोकांना कपडे घातल्याने आत्मविश्वास कमी होतो असे वाटते. म्हणून आदिमानवाचा आदर्श ठेवत ते विवस्त्र राहणे पसंत करतात. याउलट जे लोक कपडे घालतात त्यांच्याकडून पैसे आकारले जातात. असा कपडे मुक्तीचा आनंद घेण्यासाठी अनेक हौशी मंडळी आपल्या मधुचंद्रासाठी या शहराची निवड करतात म्हणे!

प्रत्येक देशाची स्वतःची संस्कृती आणि राहणीमान असते. असाच एक देश म्हणजे युरोप खंडातील फ्रान्स. फ्रान्समध्ये कॅप डी'एग्डे हे शहर पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे. तिथल्या बिनकपड्यांच्या संस्कृतीमुळे त्याला नग्न शहर असेही म्हणतात.

हे शहर समुद्राच्या काठावर वसलेले आहे. निसर्ग सौंदर्य आणि बंधनमुक्त जीवन शैली पर्यटकांना विशेष भावते. विशेषत: उन्हाळ्यात पर्यटकांची तिथे रीघ असते. पर्यटकांचे तिथे येण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे तेथील स्थानिकांसाठी पर्यटन व्यवसाय उदरनिर्वाहाची सोय करणारा आहे.

तिथल्या अनोख्या जीवन शैलीचा आनंद व अनुभव घ्यायचा असेल तर तिथल्या नियमाचे पालन करायची मनाची तयारी ठेवा. जवळपास ५०,००० पर्यटक उन्हाळ्यात तिथे येतात, विवस्त्र फिरतात. तुम्ही सुद्धा त्यांच्यातले एक होऊ शकता. मात्र तसे न केल्यास दंड भरण्याची तयारी ठेवा. हा दंड साधासुधा नाही तर भारतीय चलनानुसार तब्ब्ल बारा लाख रुपये आहे.

याचा अर्थ शहरभर हेच चित्र नसते. तिथे एक हनिमून बीच या मौज मजेसाठी राखीव ठेवला आहे. बाकी तो परिसर वगळता उर्वरित शहरात आपल्यासारखाच व्यवहार दिसून येतो. या शहराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिथे सार्वजनिक ठिकाणी शारीरिक जवळीक करणाऱ्यांकडूनही भक्कम दंड आकारला जातो. अशा दोन टोकाच्या संस्कृती तिथे नांदतात, हेच त्या शहराचे वैशिष्ट्य म्हणता येईल, नाही का?