गावठी खली! जास्त उंचीमुळे शूज, चप्पल बाजारात मिळत नाहीत; घराचे दरवाजेही होतात लहान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 08:03 PM2023-02-28T20:03:54+5:302023-02-28T20:06:05+5:30

the great khali news: उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात खलीसारखा दिसणारा 18 वर्षीय तरुण पाहायला मिळाला आहे.

उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात राहणार्‍या सीरजला झोपण्यासाठी वेगळी आठ फुटांची खाट किंवा पलंग लागतो. त्याच्या शरीराच्या आकाराचे कपडे, शूज, चप्पलही बाजारात उपलब्ध नाहीत. जास्त उंचीमुळे घराचे दरवाजेही लहान होतात. सीरज फक्त 18 वर्षांचा असून त्याची उंची द ग्रेट खलीपेक्षा कमी नाही.

सीरजचा जन्म जुलै 2004 मध्ये हमीरपूर जिल्ह्यातील मौदाहा येथील इचौली या छोट्याशा गावात गरीब शेतकरी कुटुंबात झाला. मग त्याची आई कुष्मा यांनी त्याला मोठ्या लाडाने वाढवले ​​आणि हळूहळू त्याचा आकार वाढू लागला.

सीरजच्या वडिलांची उंची 5.2 फूट आणि आईची उंची पाच फूट आहे. 2009 नंतर सीरजच्या शरीरात अभूतपूर्व बदल झाला आणि हळूहळू त्याचे शरीर मोठे होऊ लागले, असे सांगितले जाते. खरं तर तो शाकाहारी आहे. सीरज नाश्त्यात अडीच लिटर दूध पितो. याशिवाय 18 ते 20 चपात्या आणि चुलीवरच बनवलेल्या भाज्या तो खातो.

या तरुणाचे वजन 115 किलो असून उंची 7.2 फूट असल्याचे सांगण्यात येत आहे. सीरजने 2019 मध्ये भारतीय सेनेत जाण्याचा विचार केला होता. यासाठी तो दररोज 10 किलोमीटर धावण्याचा सराव करायचा.

सीरज 14 वर्षांचा असताना त्याची भूक वाढू लागली. त्याच्या कुटुंबियांकडे केवळ पाच एकर जमीन आहे, यामध्ये त्यांना पुरेसे उत्पन्न मिळत नाही. आर्थिक समस्येमुळे सीरजला हवा तसा आहार मिळत नाही, नाहीतर तो खलीपेक्षा कमी नाही.