संभाजीराजेंच्या भेटीमागचं हेच कारण, तानाजी सावंतांनी सांगितलं राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2022 06:02 PM2022-01-02T18:02:18+5:302022-01-02T18:15:23+5:30

सावंत हे संभाजीराजेंच्या स्वागतासाठी घराबाहेर आले होते, त्यावेळी संभाजीराजेंना वाकून नमस्कारही केला.

शिवसेना नेते आमदार तानाजी सावंत मागील काही दिवसांपासून पक्षावर नाराज असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे ते पक्ष बदलणार अशा चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे.

सावंत याच्या पुण्यातील कात्रज येथील घरी आज खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी सदिच्छा भेट दिली. या दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे.

त्यामुळे तानाजी सावंत हे नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तानाजी सावंत यांनी काल आपली पुढची राजकीय भूमिका घेणार असल्याचं सांगितलं होतं.

सावंत भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा होती. मात्र, आता त्यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन या भेटीचे फोटो शेअर करत माहिती दिली आहे. सावंत यांनी या भेटीत मराठा आरक्षणावर चर्चा झाल्याचं म्हटलं.

सावंत यांच्या मुंबईतील निवासस्थानी छत्रपती संभाजीराजे आणि तानाजी सावंत यांनी एकत्रितपणे स्नेहभोजनही केले. सावंत कुटुंबीयांनी संभाजीराजेंचा सन्मान व सत्कार केला.