पाच कोटी जिंकले, पण जीवनातील सुख-समाधान गेले, KBCमधील विजेत्याची व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 12:13 PM2020-09-14T12:13:30+5:302020-09-14T12:24:00+5:30

आपल्याला लॉटरी, जँकपॉट लागावा, बक्कळ पैसा मिळावा, असे सगळ्यांना वाटत असते. पण अशा लोकांपैकी अनेकांना हाती पैसा आल्यानंतर तो व्यवस्थित वापरता येत नाही. अनेकजण हा पैसा उधळून लवकरच रावाचे रंक होतात. असाच प्रकार घडला आहे कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात पाच कोटी रुपये जिंकणाऱ्या विजेत्यासोबत.

कौन बनेगा करोडपतीमध्ये पाच कोटी रुपये जिंकणारे सुशीलकुमार हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. हल्लीच त्यांनी फेसबूकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी केबीसीमध्ये पाच कोटी रुपये जिंकल्यानंतर आपल्या जीवनामध्ये कशाप्रकारे वाईट काळ सुरू झाला, याची माहिती दिली आहे.

केबीसीमध्ये जिंकल्यानंतर जगणं कठीण बनलं - Marathi News | केबीसीमध्ये जिंकल्यानंतर जगणं कठीण बनलं | Latest national Photos at Lokmat.com

सुशीलकुमार म्हणाले की, आयुष्यात अनेक समस्या सुरू झाल्या. पाच कोटी जिंकल्याने मी लोकल सेलिब्रेटी बनलो. त्यामुळे १० ते १५ दिवस बिहारमध्ये कुठे ना कुठे कार्यक्रमांसाठी जावे लागे. त्यामुळे शिक्षण पूर्णपणे सुटले. प्रसारमाध्यमांबाबत मी गंभीर झालो. लोकांना दाखवण्यासाठी व्यापार सुरू केला. त्यात खूप पैसा वाया गेला.

लोकांनीही केली खूप फसवणूक - Marathi News | लोकांनीही केली खूप फसवणूक | Latest national Photos at Lokmat.com

कौन बनेगा करोडपती कार्यक्रमात पाच कोटी रुपये जिंकल्यानंतर सुशील कुमार यांना गुप्तदान देण्याची सवय लागली. त्या काळात त्याने खूप पैसे दान केले. यादरम्यान, त्यांच्याकडे असेही काही लोक आहे ज्यांनी त्यांना फसवण्याचा प्रयत्न केला. अशा लोकांबाबत त्याच्या पत्नीने त्यांना खूप समजावले मात्र त्यामुळे त्याचे पत्नीसोबत असलेले संबंध बिघडले.

 अनेक कारची केली खरेदी - Marathi News | अनेक कारची केली खरेदी | Latest national Photos at Lokmat.com

यादरम्यान, सुशील कुमार यांनी काही कार खरेदी केल्या. त्या दिल्लीमध्ये चालवण्यास दिल्या. त्यामुळे त्याला वारंवार दिल्लीमध्ये जावे लागे. तिथे त्यांची ओळख जामिया मिलिया आणि आयआयएमसीमध्ये प्रसारमाध्यम विषयाचे शिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थ्यांशी झाली. तसेच जेएनयूमध्ये संशोधन करत असलेले विद्यार्थी, थिएटर आर्टीस्ट असलेल्या लोकांशीही परिचय झाला. त्यातून आपल्याला खूप काही माहिती नाही याची जाणीव त्यांना झाली.

व्यसनही लागले - Marathi News | व्यसनही लागले | Latest national Photos at Lokmat.com

याच काळात सुशील कुमारला दारू आणि सिगारेट यांचेही व्यसन लागले.

सिनेजगतातही नशीब आजमावण्याचा केला प्रयत्न - Marathi News | सिनेजगतातही नशीब आजमावण्याचा केला प्रयत्न | Latest national Photos at Lokmat.com

सुशील यांनी पुढे सांगितले की, रिकाम्या वेळामध्ये मी हॉलिवूड आणि बॉलिवूडचे चित्रपट पाहत असे. त्यातून मला चित्रपट दिग्दर्शक बनण्याची ओढ लागली. त्यासाठी मी मुंबईत गेलो. मात्र तिथे मला आधी टीव्हीवर काम करण्याचा सल्ला दिला गेला. त्यानंतर मी एका प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम केले. मात्र लवकरच ते कामही सोडले.

पुन्हा परतले माघारी - Marathi News | पुन्हा परतले माघारी | Latest national Photos at Lokmat.com

अखेरीस हे सर्व झाल्यावर सुशील कुमार पुन्हा बिहारमध्ये पोहोचले. तिथे त्यांनी शिक्षण बनण्यासाठी तयारी सुरू केली. आता आपण शिक्षक म्हणून काम करत असून, २०१६ पासून आतापर्यंत मद्यपान केलेले नाही, असे त्यांनी सांगितले.

Read in English