असा दिसणार रामलल्लांचा दरबार, पाहा राममंदिराच्या गर्भगृहातील आतापर्यंत समोर न आलेले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 06:20 PM2023-11-01T18:20:06+5:302023-11-01T18:27:25+5:30

Ram Mandir Ayodhya: अयोध्येमध्ये राम मंदिराचं बांधकाम वेगानं सुरू आहे. मंदिराच्या गर्भगृहाच्या निर्मितीचं काम जवळपास पूर्ण झालं आहे. प्राणप्रतिष्ठापनेसाठी गर्भगृहाचं मुख्य द्वार कलाकृतींनी सजवण्यात येत आहे.

अयोध्येमध्ये राम मंदिराचं बांधकाम वेगानं सुरू आहे. मंदिराच्या गर्भगृहाच्या निर्मितीचं काम जवळपास पूर्ण झालं आहे. प्राणप्रतिष्ठापनेसाठी गर्भगृहाचं मुख्य द्वार कलाकृतींनी सजवण्यात येत आहे.

राम मंदिरामध्ये रामलल्लांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना २२ जानेवारी २०२४ रोजी करण्यात येणार आहे. तत्पूर्वी डिसेंबर २०२३ पर्यंत राम मंदिरामधील फरशी, संगमरवर लावण्याचं आणि लायटिंगचं काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

राम मंदिराच्या गर्भगृहाचं काम जवळपास पूर्ण होत आलं आहे. तसेच प्राणप्रतिष्ठापनेसाठी गर्भगृहातील सजावटीचं काम सुरू आहे.

राम मंदिराच्या गर्भगृहामध्ये भगवान श्रीरामांसह ब्रह्मा, विष्णू, महेश यांचेही दर्शन होणार आहे. मंदिरामध्ये क्षीरसागरात विश्रांती घेत असलेले विष्णू त्यांच्या नाभीतून जन्म घेणारे ब्रह्मा आणि त्यांच्या शेजारी शिवशंकर यांचं दर्शन घेता येणार आहे.

राम मंदिराच्या गर्भगृहामध्ये बजरंगबलींसाठी खास स्थान असणार आहे. भक्तरूपी हनुमंत गर्भगृहाच्या दोन्ही दिशांमध्ये हात जोडलेल्या मूद्रेमध्ये दिसतील.

गर्भगृहातील वरच्या भागामध्ये पांढऱ्या दगडांवर कलाकृती कोरल्या जात आहेत.

राम मंदिराच्या पहिल्या तटबंदीच्या मुख्य द्वाराचं काम सुरू आहे. मुख्य द्वाराखाली २०० मीटर लांब बोगदाही तयार करण्यात येत आहे.

गर्भगृहाच्या मुख्य गेटच्यावरील पांढऱ्या दगडांवर मूर्ती कोरण्याचं काम सुरू आहे.

राम मंदिराच्या गर्भगृहाचं काम जवळपास पूर्ण झालं आहे. आता साफसफाईचं काम करण्यात येत आहे.

अयोध्येत सुरू असलेल्या राम मंदिराच्या पहिल्या मजल्याचं कामसुद्धा वेगानं सुरू आहे.

राम मंदिरामध्ये भाविकांच्या दर्शनासाठीही विशेष मार्गाची व्यवस्था असणार आहे. वृद्ध आणि दिव्यांगांसाठी वेगळा मार्ग बनवला जात आहे. तसेच राम मंदिराच्या तळमजल्यावर ४ लिफ्ट लावण्यात येत आहेत.