The Kashmir Files: दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनीच केला सिनेमाच्या स्क्रिनींगला विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 05:51 PM2022-03-20T17:51:48+5:302022-03-20T18:06:56+5:30

क्रिएटीव्ह बिझनेसचा आदर सन्मान करायला हवा. कायदेशीर आणि सनदशीर मार्गानेच हा चित्रपट लोकांना दाखवयला हवा, असेही अग्निहोत्री यांनी म्हटलंय.

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट (The Kashmir Files) चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. काश्मिरी पंडितांवर झालेले अत्याचार या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत.

मोठ्या संख्येने प्रेक्षक चित्रपटगृहात हजेरी लावत आहेत. अनेक बड्या चित्रपटांना टक्कर देत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा गल्ला जमवत १०० कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळवले आहे.

मात्र, या चित्रपटावरुन चांगलाच गदारोळही माजला आहे. समर्थनार्थ आणि विरोधात अनेकजण सोशल मीडियावर भिडत आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या सिनेमाचं कौतूक केल्यानंतर भाजप नेते चित्रपटाचे शो बुक करत आहेत.

देशातील काही राज्यांत हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. तर, अनेक ठिकाणी चित्रपटांचे बुकींग नेतेमंडळींकडून करण्यात येत आहे. काहींनी विद्यार्थ्यांनाही हा चित्रपट सवलतीच्या दरात दाखवला आहे.

हरयाणातील रेवाडी शहरातील एका हॉलमध्ये एलईडी स्क्रीनद्वारे या सिनेमाचं स्क्रीनींग करण्यात येणार होतं. आज सायंकाळी 6.30 वाजता त्यासाठी भागातील लोकांना निमंत्रणही देण्यात आलं होतं.

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी या ओपन स्क्रिनींग चित्रपटाच्या शोला विरोध केला असून असा चित्रपट दाखवणे हे फौजदारी गुन्हा असल्याचं त्यांनी म्हटलंय.

अग्निहोत्री यांनी हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल ठक्कर यांना ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली. तसेच, राजकीय नेत्यांनी तिकीट विकत घेऊन, शांतपणे, देशभक्ती आणि समाजसेवा करायला हवी.

क्रिएटीव्ह बिझनेसचा आदर सन्मान करायला हवा. कायदेशीर आणि सनदशीर मार्गानेच हा चित्रपट लोकांना दाखवयला हवा, असेही अग्निहोत्री यांनी म्हटलंय.

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटाचे राई्टस रिझर्व्ह ठेवले आहेत. त्यामुळे, हा चित्रपट अशारितीने ओपन स्पेसमध्ये, हॉलमध्ये स्क्रिनींग करता येत नाही.